Homeचिट चॅटकझाकिस्तानकडून भारताला मदतीचा...

कझाकिस्तानकडून भारताला मदतीचा हात

कोरोना संकटाशी लढणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी कझाकिस्तानने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कझाकिस्तानचे अध्यक्ष कॅसिम जोमर्ट टोकायेव यांच्या मार्गदर्शनानुसार व भारत-कझाकिस्तान या दोन देशांमधील सामरिक भागीदारीच्या तत्त्वानुसार कझाकिस्तानने भारताला कोरोनाशी लढण्यासाठी मदत पाठवली आहे.

कझाकिस्तान येथून दोन मालवाहू विमाने मदतीची सामग्री घेऊन नवी दिल्ली विमानतळावर नुकतीच उतरली. ४० टन वैद्यकीय सामग्री घेऊन आलेल्या या मालवाहू विमानांमध्ये मेडिकल मास्क, रेस्पिरेटर्स, प्रोटेक्टिव्ह सूट, पोर्टेबल आर्टिफिशियल लंग व्हेंटिलेशन डिव्हाईस यांचा समावेश आहे.

कझाकिस्तानचे भारतातील राजदूत नुरलन झालगासबायेव यांच्या हस्ते भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या युरेशियन विभागाचे संचालक वंडारु विल्सनबाबू यांच्याकडे सोपवण्यात आली. ४ मे रोजी कझाकिस्तानचे राष्ट्रपती टोकायेव यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून भारतातील कोरोनाच्या वाढीबाबत काळजी व्यक्त करुन ७ मे रोजी कझाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांना भारताला आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे ही मदत नवी दिल्ली येथे पोहोचवण्यात आली आहे.

भारताने गतवर्षी २०२०मध्ये कझाकिस्तानला कोरोनाविरोधातील लढ्याला मदत म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या पाठवल्या होत्या.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content