९ आणि १३ ऑक्टोबरला गोरेगाव-कांदिवली परिसरात पाणी नाही!

मुंबईतल्या मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा बदलण्याच्या कामासाठी सोमवार, दिनांक ९ आणि शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्‍या झडपा जुन्या व खराब झाल्यामुळे (एकूण १० जलद्वार) बदलण्‍याचे काम प्रस्‍तावित असून संपूर्ण काम दोन टप्‍प्‍यात पूर्ण करण्‍यात येईल. त्यापैकी पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामात ९०० मिलीमीटर व्यासाचे तीन व ७५० मिलीमीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०४ जलद्वार (वॉल्‍व) सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्‍यात येणार आहेत. दुसऱ्या टप्‍प्‍यात ९०० मिलीमीटर व्यासाचे ०२ व ७५० मिलीमीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०३ जलद्वार शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्‍यात येतील.

त्यामुळे सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी व शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पूर्व), ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव (पूर्व) आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील.

पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील:-

१) ‘पी उत्तर’– मालाड (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

२) ‘पी दक्षिण’– गोरेगाव (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

३) ‘आर दक्षिण’– कांदिवली (पूर्व) येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा – १ व २, नर्सीपाडा  परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content