Homeबॅक पेजसीबीडीटीने ८ महिन्यांत...

सीबीडीटीने ८ महिन्यांत केले ४६ हजार तक्रारींचे निराकरण! 

सरकारी कार्यालयांमध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यांच्यासाठी केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 2022पासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत विशेष मोहीम 2.0ची अंमलबजावणी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर विभागातील इतर दुय्यम कार्यालयांसह या विशेष मोहीम 2.0 मध्ये उत्साहाने भाग घेतला. या विभागाने डिसेंबर, 2022 ते जुलै, 2023 या कालावधीत सीपीजीआरएएमएस पोर्टलवर नोंदवण्यात आलेल्या 46,000 सार्वजनिक तक्रारींचे निवारण केले तसेच तक्रारींच्या संदर्भातील या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या सुमारे 7,000 अपिलांवर कार्यवाही केली.

विशेष मोहीम 2.0 अंतर्गत, सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर, अटारी येथे सूक्ष्म वनांच्या मालिकेचे रोपण तसेच उद्घाटन करुन हरित आच्छादन वाढवण्याच्या उद्देशाने हरित आयकर (आयकर विभागातर्फे करण्यात आलेला हरियाली साध्य ठराव) हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला. आयकर विभागाच्या इमारतींच्या परिसरातील तसेच आसपासच्या जागा तसेच इतर सार्वजनिक स्थानांवर हिरवाई वाढवण्यासाठी तसेच सूक्ष्म वनांची निर्मिती करण्यासाठी, हरित आयकर उपक्रमाची उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करण्याची आग्रही विनंती गुप्ता यांनी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना केली.

त्यानुसार, हरित आयकर मोहिमेअंतर्गत, डिसेंबर, 2022 ते जुलै, 2023 या कालावधीत 103 सूक्ष्म वने निर्माण करण्यात आली. देशभरात लावण्यात आलेल्या या सूक्ष्म वनांनी दीड लाख वर्ग फुट क्षेत्राहून अधिक जागा व्यापली आहे. तसेच, अधिकृत कार्यक्रमांसाठी विभागाच्या कार्यालयात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करताना त्यांना कुंडीत लावलेले रोपटे अथवा जैवविघटनकारी पदार्थांमध्ये गुंडाळलेली फुलाची फांदी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

सध्या सुरु असलेली मोहीम पुढे सुरु ठेवत, सीबीडीटीने विशेष मोहीम 3.0 ची जोरदार तयारी सुरु केली आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबर, 2023 पासून सुरु होणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content