Homeबॅक पेजआणखी 55 जिल्ह्यांमध्ये...

आणखी 55 जिल्ह्यांमध्ये गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य!

सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रमाणीकरण (तृतीय सुधारणा) आदेश, 2022नुसार अनिवार्य असलेल्या प्रमाणीकरणाचा तिसरा टप्पा 8 सप्टेंबर 2023 पासून अंमलात आला आहे. अनिवार्य प्रमाणीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अनिवार्य हॉलमार्किंग प्रणाली अंतर्गत आणखी 55 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर हॉलमार्किंग केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

यामुळे अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची एकूण संख्या 343 झाली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या 55 जिल्ह्यांची यादी राज्यांनुसार भारतीय मानक ब्युरो, BISच्या www.bis.gov.in या संकेतस्थळावर हॉलमार्किंग विभागानंतर्गत उपलब्ध आहे. केंद्र सरकारने हा आदेश 8 सप्टेंबर 2023 रोजी जारी केला. BIS ने 23 जून 2021 पासून देशाच्या 256 जिल्ह्यांत आणि दुसऱ्या टप्प्यात 4 एप्रिल 2022 पासून अतिरिक्त 32 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य प्रमाणीकरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे, ज्यात HUID सोबत रोज 4 लाखाहून जास्त सोन्याच्या वस्तूंचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

अनिवार्य हॉलमार्किंगची अंमलबजावणी झाल्यापासून नोंदणीकृत दागिने विक्रत्यांच्या संख्येत 34,647 वरून 1, 81,590 इतकी वाढ झाली आहे, तर असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 945 वरून 1471 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 26 कोटींहून अधिक सोन्याचे दागिने HUID सह हॉलमार्क केले गेले आहेत.

ग्राहकांनी बीआयएस केयर ॲपवरून ‘व्हेरिफाय एचयूआयडी’ वापरून खरेदी केलेल्या हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता आणि शुद्धता पडताळून पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

बीआयएस केअर ॲपच्या डाउनलोड केलेल्यांची संख्या 2021-22 मध्ये 2.3 लाखांवरून चालू आर्थिक वर्षात 12.4 लाख इतकी झाली आहे. याशिवाय, गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत बीआयएस केअर ॲपमध्ये ‘व्हेरिफाय एचयूआयडी’वर एक कोटीहून अधिक हिट्सची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यानंतर असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रा /ओ एस सी असणा-या 55 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना, नंदुरबार, परभणी आणि यवतमाळ चा समावेश आहे. चंद्रपूरमध्ये दोन तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हॉलमार्किंग केंद्र आहे. तर या जिल्ह्यातील नोंदणीकृत ज्वेलर्स केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : चंद्रपूर 122, जालना 65, नंदुरबार 83, परभणी 94, यवतमाळ 190.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content