NPS आणि अटल पेन्शनचे लाभार्थी 6.62 कोटींहून अधिक!

राष्ट्रीय पेन्शन (निवृत्ती वेतन) प्रणाली (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजने (एपीवाय) अंतर्गत एकत्रितपणे नोंदवल्या गेलेल्या ग्राहकांची संख्या 6.62 कोटीच्या पुढे गेली आहे आणि व्यवस्थापना अंतर्गत एकूण मालमत्ता (एयुएम) रु 10 लाख कोटी इतकी झाली आहे.

SectorAUM (In Rupees)
Central Government2,40,902.87
CAB42,246.13
State Government4,36,071.72
SAB63,133.73
Corporate1,35,218.06
All Citizen Model47,663.36
NPS Lite5,157.12
APY30,051.28
Total10,00,444.26

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), संबंधित जोखीम आणि ट्रेड-ऑफची स्पष्ट समज राखून सदस्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी, पूर्ण माहिती पश्चात निर्णय घेण्यासाठी आणि औपचारिक आर्थिक क्षेत्राच्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात.

एनपीएस

1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (सशस्त्र दल वगळता) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) लागू करण्यात आली आहे. त्यानंतर, 1 जून 2015 पासून, अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेने सामाजिक सुरक्षा योजनांना आवश्यक ती गती दिली आहे.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस (एनपीएस दिवस)

निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती नियोजनाला चालना देण्याच्या उद्देशाने, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA), दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस “राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस (NPS दिवस)” म्हणून साजरा करते. हा उपक्रम भारतीय नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या टप्प्यात आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यामध्ये हातभार लावतो.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content