Homeपब्लिक फिगरआशिष शेलार यांनी...

आशिष शेलार यांनी काढली शिवसेनेची औकात!

जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचे पाहिले पाऊल कुबड्यांशिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

पश्चिम बंगालच्या निकालावरुन कालपासून भाजपाला लक्ष करणाऱ्या सर्व पक्ष आणि नेत्यांना आणि खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना चोख प्रत्त्युत्तर देताना ते बोलत होते. भाजपला पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरे आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपाकडेच आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्ती बद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली.

पंढरपुरात काय झाले?

पंढरपुरात मग काय झाले? यालाच स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याकडे बघायचे वाकून असा प्रकार म्हणतात. नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागणार का? असा सवालही त्यांनी केला.

नाना पटोलेंचे आयुष्य कालाकांडीत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आयुष्यच कालाकांडीच्या कामात गेले. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही. माहितीविना बोलणे म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद, अशी टीकाही शेलार यांनी केली.

पुनावालांना धमकी देणाऱ्यांची माहिती आमच्याकडे

अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्राने आपले कामे चोख केले आहे. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यात गैर काय? आज यावर राजकारण करायचे नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांना उघडे करण्याचे काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहितीसुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार राहवे, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीसांचा इशारा गर्भितच

देवेन्द्रजी कोणतीही वाक्ये वापरतात त्याचा गंभीर आणि गर्भित इशारा असतो. त्यामुळे त्यांनी पंढरपुरात केलेले विधानही गर्भितच होते, असेही शेलार म्हणाले.

महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे. ज्यावेळी आम्ही बोलत असलेल्या भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा पाचही बोटे राष्ट्रवादीकडे जातात. भाजपाच्या नेत्यांविषयी, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याविषयी, राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्याविषयी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सभेमध्ये, सोशल मीडियावर काय बोलत आहेत हे एकदा पाहा. अजूनही आम्ही संयमाने वागत आहोत, हे लक्षात ठेवा. आमची भूमिका स्पष्ट आहे, जनतेला मदत करणे. सर्व नेते राज्यातील जनतेला आधार वाटावा यासाठी फिरत आहेत. आम्ही योग्य वेळी धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content