Homeटॉप स्टोरीराहुल गांधींनी आळवला...

राहुल गांधींनी आळवला पुन्हा ‘जेपीसी’चा राग!

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या चीनच्या नागरिकाला भागीदार म्हणून घेणाऱ्या अदानी समुहाच्या आर्थिक व्यवहारांची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केली.

आजपासून मुंबईच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी आल्यानंतर एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. ब्रिटनच्या एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी आणि त्यांच्या दोघा भागीदारांनी भारतातून एक बिलियन डॉलर परदेशात पाठवले. त्यानंतर हेच पैसे पुन्हा भारतात आले. हे पैसे कोणाचे आहेत? ते जर अदानींचे असतील तर तसे  स्पष्ट करा. नाही तर ते कोणाचे आहेत, यामागे मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे.

अदानी समुहातल्या या दोन भागीदारांपैकी एक भागीदार चँग चुग लिंग चीनचा भागीदार असून चीन हे भारतासाठी धोकादायक राष्ट्र आहे. अदानी संरक्षण मंत्रालयातही कामे घेतात. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. मग अशावेळी या साऱ्या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सेबीने अदानी समुहाला क्लीन चिट दिलेली आहे. ही क्लीन चिट देणारे तत्कालीन अध्यक्ष आता अदानींच्या एका वृत्तवाहिनीच्या संचालकपदावर काम करत आहेत. त्यामुळे या चौकशीबद्दल संशय व्यक्त होत आहे. त्यामुळेच अदानी समुहाच्या व्यवहारांची जेपीसीमार्फत चौकशी केली गेली पाहिजे, अशी आग्रही मागणी राहुल गांधी यांनी केली.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content