Homeएनसर्कलनितीन गडकरींनी इथेनॉलवर...

नितीन गडकरींनी इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली कार केली लॉन्च!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे म्हणजेच इथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या कारचे नुकतेच उद्घाटन केले. हे वाहन टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने विकसित केले आहे.

या कार्यक्रमाला, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे, टोयोटा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझु योशीमुरा, किर्लोस्कर सिस्टिम्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली किर्लोस्कर, जपानच्या दूतावासातील राजदूत, सरकारी अधिकारी यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉल हे स्वदेशी, पर्यावरण-स्नेही आणि नवीकरणीय इंधन असून भारतात या इंधनाला मोठा वाव आहे. मोदी सरकारने इथेनॉलच्या वापरावर दिलेला भर उर्जेच्या संदर्भातील स्वयंपूर्णता मिळवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, उर्जादाते म्हणून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे या उद्दिष्टांसह त्यांना अन्नदाता म्हणून मदत करणे आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणे सुरु ठेवणे यांना अनुसरून आहे.

ते म्हणाले की ज्या दिवशी इथेनॉलची अर्थव्यवस्था 2 लाख कोटी रुपयांची होईल तेव्हा कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर सध्याच्या 12% वरुन 20% पर्यंत पोहोचेल. जैवइंधनांच्या क्षेत्रातील अभिनव संशोधनांबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आसाममधील नुमलीगड येथे भारतीय तेल महामंडळाने उभारलेल्या तेल शुद्धीकरण केंद्राचा उल्लेख चर्चा केला. या केंद्रामध्ये जैवइथेनॉल निर्मितीसाठी बांबूचा वापर केला जातो.

आज उद्घाटन झालेले हे अभिनव पद्धतीचे वाहन इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे आणि त्याची निर्मिती करताना भारताच्या अधिक कठोर उत्सर्जनविषयक मानकांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ते जागतिक पातळीवरील सर्वात पहिले बीएस 6 (पातळी 2) ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईप वाहन ठरले आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content