Homeटॉप स्टोरीअजितदादांच्या निर्णयांवर फडणवीसांची...

अजितदादांच्या निर्णयांवर फडणवीसांची नजर?

राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये वाढत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आता त्यांच्या सहकारी पक्षांनी पावले टाकली असून पवार यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्मयांवर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर राहणार असल्याचे कळते.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच वित्त खाते सोपविण्यात आल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनमता पार्टी तसेच शिवसेनेच्या गोटातल्या आमदारांना पुरेसा निधी मिळेल की नाही याबद्द साशंकता निर्माण झाली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे पालक मंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निधी अडविला गेल्याचीही रंगली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाचे नेत फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार केल्याचे बोलले जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा तक्रारींवर आता तोडगा काढण्यात ला आहे. वित्तमंत्री तथा उपमुक्यमंत्री अजित पवार घेत असलेले निर्णय प्रथम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाहणीसाठी जातील. त्यांनी मान्यता दिल्यानंतर अंतीम मान्यकरीता ते मुख्यमंत्र्यांकडे जातील. त्यामुळे पवार यांना सत्तेत राहताना आपल्या मित्रपक्षांचे पंख झाटण्यावर मर्यादा पडतील, असे बोलले जाते.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content