Homeमाय व्हॉईसअवर्सेकरांना 2 हजार...

अवर्सेकरांना 2 हजार कोटींची लॉटरी तर भुजबळ बंधूंना नाममात्र दक्षिणा!

तुम्हाला नक्कीच आठवत असेल की सुमारे पाच-दहा वर्षांपूर्वी प्रत्येक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये शनिवार, रविवारी गीतांजली जेम्सच्या भल्या मोठ्या जाहिराती गुळगुळीत पानांवर, सुंदर ललानांसह आपल्यावर भुरळ टाकण्यासाठी भेटीला येत असत. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, ही भुरळ गीतांजलीला बँका आणि केंद्र सरकारवर टाकायची होती. ही भुरळ टाकण्यात ती कमालीची यशस्वी झाल्याचे दिसत आहे. लाखो रुपयांची रत्ने विकून ‘गीतांजली’ने बँकाना 8 हजार कोटींचा चुना लावला! भुरळ पाडल्याशिवाय का त्यांचे इतक्या हजार कोटींचे कर्ज माफ झाले? तुम्ही-आम्ही कर्ज परतफेडीचा एखादा हफ्ता इकडेतिकडे करून द्या अशी विनवणी केली की आपल्याला कसे हाडतूड करतात आणि या कर्जबुडव्यांना कसे लाल कार्पेट अंथरतात, हेच या कर्जबुडव्य्यांच्या यादीवरून एक नजर फिरवली तरी कळून चुकते. अवर्सेकरांच्या युनिटीच्या कर्जमाफीची रक्कम सुमारे दोन हजार कोटी रुपये इतकी आहे. भुजबळ बंधू यांना केवळ सुमारे 10 कोटींची दक्षिणा मिळालेली दिसते.

या कर्जमाफीच्या यादीत अनेक डायमंड कंपन्या आहेत. तसेच इस्पातच्या अनेक कंपन्या आहेत. त्यांची एकत्रित कर्जमाफीची रक्कम हजार कोटींच्या घरात सहज जाईल. अवर्सेकरांच्या युनिटीच्या कर्जमाफीची रक्कम सुमारे दोन हजार कोटी रुपये इतकी आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत युनिटी भलतीच फॉर्मात होती, हे तुम्ही सर्व जाणताच! मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही एकदा आपल्या भाषणात ‘युतीच्या राज्यात एकाच मराठी माणसाचे भले झाले आणि तो माणूस म्हणजे अवर्सेकर!’ असे खोचक विधान केले होते. पुण्याची वादग्रस्त शिक्षण संस्था ‘सिंहगड तंत्रशिक्षण संस्था’ यांनीही या कर्जबुडव्यांच्या यादीत स्थान मिळवलेले आहे (सुमारे 200 कोटी फक्त).

कोणी फडणवीस प्रॉपर्टीस लिमिटेड ही कंपनीही या यादीत दिसत आहे (सुमारे 100 कोटी). हे फडणवीस कोण याची चौकशी केली असता नागपूरकर मंडळींनी चक्क कानावर हात ठेवले. दीनदयाळ मेडिकल ट्रस्टचाही यात समावेश आहे (सुमारे 90 कोटी). फिटनेसचे धडे देणारे तळवलकरही यात अनफिट झाल्याने बसलेले दिसतात (सुमारे 70 कोटी). व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी प्रसिद्धीस आलेली कोचर यांची कंपनीही या गर्दीत कोचर ओव्हरसीस, या नावाने अंग चोरून बसलेली दिसते (सुमारे 25 कोटी). भुजबळ बंधू यांना केवळ सुमारे 10 कोटींची दक्षिणा मिळालेली दिसते. भुजबळ बंधूंच्या बांधकाम कंपनीसही अवघे 5 कोटी माफ केलेले दिसत आहेत. माध्यम क्षेत्रातील नवभारत व डेक्कन क्रॉनिकल या कंपन्यानीही यादीत स्थान मिळवले आहे. निंबस आणि थर्ड आय, याही येथे आहेत.

राजकीय पक्षांच्या देणगीयाद्याही तपासा

या कर्जबुडव्यांच्या यादीत अनेक डायमंड कंपन्या आहेत. खनिज कंपन्या तर डझनावारी आहेत. बांधकाम व्यावसायिक कंपन्याही काही कमी नाहीत. या यादीबरोबरच कर्ज वसुलीसाठी बँकानी काय काय प्रयत्न केले आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला याचेही विवरण मिळाले पाहिजे. या घेतलेल्या कर्जामुळेच त्यांना उर्जीतावस्था मिळालेली असल्याने त्यांची वैयक्तिक संपत्तीही जप्त होणे गरजेचे आहे. कारण हेच कर्जबुडवे अजूनही पंचतारंकित लाईफस्टाईल जगणे जगत आहेत. आणखी एक महत्वाचा मुद्दा… या कर्जबुडव्या कंपन्याची नावे जशी जाहीर करण्यात आली आहेत तशीच त्यांच्या मालकांची, संचालकांची नावेही जनतेला कळायला हवीत. मग पेटारा बाहेर पडेल, कोणी किती कोटी रुपयांच्या देणग्या कोणत्या रजकीय पक्षांना दिल्या आहेत की कोणी आणखी निवडणूक रोखे खरेदी केलेले आहेत. हेही देशाला समजले पाहिजे…

“लाटा तहान भुकेच्या भळाभळा, सुकलेल्या ओठांवर

आणि थंडपणे कत्तल चालू आहे

माणसांची अक्कल हुशारीने

त्याचा दुर्गंध पसरला आहे असीम!!

असाच चालू राहिला अखंड अध:पात-अपघात-विश्वासघात

तर थांबावे कशाला समुद्राने वाळूच्या बांधावर?

रक्त इतके स्वस्त व्हावे का की इथून तिथून वाहावे” (शांताराम)

….

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content