Homeन्यूज अँड व्ह्यूजश्रावणी सोमवार आणि...

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)!

हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रतवैकल्ये सुरू होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केले जाते. या वर्षी हे व्रत 21, 28 ऑगस्ट आणि 4, 11 सप्टेंबर या दिवशी असणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे, पूजा करणे, शिवामूठ वाहणे अश्या प्रकारे हे व्रत केले जाते. प्रस्तुत लेखातून ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी विवेचन करण्यात आले आहे.

सोमवारव्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्याप्रमाणे आणि रूढीपरंपरेनुसार सुरू असतात. अशा या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्तीभावाने करून त्या माध्यमातून देवतेचे तत्त्व ग्रहण करून आनंद घेऊया.

प्रत्येक सोमवारी करावयाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार- श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा करावी आणि शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे शंकर प्रसन्न होऊन शिवसायुज्य मुक्ती मिळते.

श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत पूजा करण्याचे महत्त्व ग्रंथ व्रत राज, यामधील खालील श्लोकातून केले आहे. याचा अर्थही पुढे दिला आहे. 

‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।

वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम्।।’

अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत पूजा करावी.

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

शिवाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया- 

1) आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

2) शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.

3) शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.

4) वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.

शिवाची षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो. पूजा करताना शिवाला पांढरे फूल वाहू शकतो. त्रिदल बेल वाहवा. शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालावी. त्या दिवशी शिवाचा ‘ॐ नम: शिवाय’, असा नामजप अधिकाधिक करावा. 

शिवामूठ व्रत करण्याची पद्धत- विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संपर्क: 9920015949

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content