Homeन्यूज अँड व्ह्यूजआम्हालाही राजकारणात तिरक्या...

आम्हालाही राजकारणात तिरक्या चालीच्या उंटांशी सामना करावा लागतो..

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद याने एकाच वेळी २२ खेळाडूंसोबत मुकाबला केला. खरे तर त्याने राजकारणात यायला हवे. राजकारणात आम्हालाही एकाच वेळी अनेक विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरख्या चालीचे उंट असतात. काही अडीच घर चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सर्वांशी मुकाबला करावा लागतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये रोटरी क्लब, ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप एकेडमी यांच्या वतीने बुद्धिबळाचे प्रदर्शनीय सामने भरविण्यात आले होते. त्यात पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद एकाच वेळी २२ प्रतिस्पर्धी मुलांशी खेळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार होते. परंतु कार्यबाहुल्यामुळे ते प्रत्यक्ष पोहोचू शकले नाहीत आणि त्यांनी आपला व्हिडिओ संदेश कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवला. त्यात त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या वर्षभरापासून मला चेकमेट करण्यासाठी अनेकजण सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे स्वप्न साकार होत नाही. त्यांनी आपली कितीही शक्ती पणाला लावली तरी जनतेचा विश्वास आणि पाठिंबा आमच्याबरोबर असल्यामुळे त्यांना यश येणार नाही असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

२००५ साली बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्याचे काम अपस्टेप एकेडमी करत आहे. आतापर्यंत या संस्थेने २१ हजार २५२ मुलांना बुद्धिबळ खेळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमात २६ शाळा त्यांच्यासोबत सहकार्य करत आहेत. ४३ केंद्रांतून ही संस्था प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे तर २१६ स्पर्धांचे आयोजनही या संस्थेने केले आहे.

(सर्व छायाचित्रेः गौरव कागडा)

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content