Homeडेली पल्ससीबीआय मुंबईची आर्थिक...

सीबीआय मुंबईची आर्थिक गुन्हे शाखा यंदा सर्वोत्कृष्ट!

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय (CBI), मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOB) काल दिल्लीतील मुख्यालयात आयोजित केलेल्या अलंकरण समारंभात सर्वोत्कृष्ट शाखेसाठी दिवंगत एस. के. पलसानिया स्मृती चषक प्रदान करण्यात आला. चंदिगडमधील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच चेन्नईमधील सीबीआयचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी संयुक्तपणे उपविजेत्या शाखेला दिला जाणारा एच.सी.सिंग स्मृती चषक पटकावला. विभागाच्या 60 अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदकेही प्रदान करण्यात आली. या विशेष समारंभात भारताचे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्या हस्ते विजेत्यांना चषक आणि पदके प्रदान करण्यात आली.

आर. व्यंकटरमणी यांनी या प्रसंगी बोलताना पदक विजेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांनीही पदक विजेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि पदक विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content