Homeबॅक पेजदुबईच्या राशीद बंदरात...

दुबईच्या राशीद बंदरात चालू आहे युद्धाभ्यास ‘झायेद तलवार’!

भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस त्रिकंद, 08 तारखेपासून आजपर्यंत म्हणजेच 11 ऑगस्ट 2023 दरम्यान दुबईच्या राशीद बंदराच्या दौऱ्यावर आहेत. नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे प्रमुख, ध्वज अधिकारी रिअर अॅडमिरल विनीत मॅकार्टी यांच्या नेतृत्त्वाखाली हा दौरा होत आहे. आयएनएस विशाखापट्टणमची धुरा कॅप्टन अशोक राव तर आयएनएस त्रिकंदची धुरा कॅप्टन प्रमोद जी थॉमस सांभाळत आहेत.

या भेटीदरम्यान, दोन्ही देशांचे नौदल दल सागरी कार्यान्वयना संबंधित विविध घटकांवर व्यावसायिक संवाद साधतील. दोन्ही नौदलांमधील सहकार्य वाढवणे आणि संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्वोत्तम पद्धतीही सामायिक करतील. युएई नौदलासोबत ‘झायेद तलवार’ हा द्विपक्षीय युद्धाभ्यासदेखील नियोजित आहे. यामुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि समन्वय वाढेल. या भेटीमुळे उभय नौदलांमधील सागरी भागीदारी आणखी वाढेल आणि या प्रदेशातील सुरक्षा आव्हानांची परस्पर समजही वाढेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content