Homeहेल्थ इज वेल्थसाथरोगांच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची...

साथरोगांच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा!

सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी नुकत्याच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेतलेल्या साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.

या बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, आरोग्य विभागाचे संचालक नितीन अंबाडेकर उपस्थित होते. तर राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ऑनलाईन उपस्थित होते. राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आदी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रूग्णवाढीची कारणे व उपाययोजनांवर चर्चा झाली.

साथरोगां

आरोग्य मंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, साथरोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी राज्यस्तरीय वॉर रूमसह ज्या भागात एखाद्या साथरोगाचा उद्रेक झाला किंवा बऱ्यापैकी साथरोगांचे रूग्ण मिळत आहेत. अशा भागात साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी एक वॉर रूम तयार करावी. ही वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रूमसोबत संलग्न असावी. वॉर रूमला साथरोग रूग्णांबाबत, फैलावाबाबत 24 तासांत माहिती द्यावी जेणेकरून उपाययोजना करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थाने शोधावी. त्यांना नष्ट करून किटकजन्य साथरोग आटोक्यात आणावा. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबाला प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकही करावे.

साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा नियमितरित्या करण्याच्या सूचना करीत मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, औषधांचा पुरवठा कुठेही बाधीत होता कामा नये. आवश्यक औषधांचा साठा तपासून घ्यावा. त्यानुसार नियोजन करावे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत शालेय मुलांची तपासणी करावी. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मलेरिया रूग्णसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उपाययोजना कराव्यात. धूरफवारणी नियमित करावी. बांधकामांमुळे पाणी साचून किटकजन्य आजारांमधील वाढ लक्षात घेता, मुंबईत पालिकेच्या आरोग्य विभागाने बांधकाम परवानगी देणाऱ्या विभागाची मदत घेऊन पाणी न साचण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

अप्पर मुख्य सचिव म्हैसकर यांनी साथरोगांच्याबाबत जनजागृतीवर भर देऊन नागरिकांना याबाबत शिक्षीत करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त धीरजकुमार म्हणाले की, पाणी नमुने तपासणी महत्त्वाचे आहे. दूषित पाणी नमूना आल्यास त्याठिकाणी आवश्यक कारवाई करावी. रक्त नमुन्यांचे संकलन वाढवावे. मलेरिया, डेंग्यू व चिकुनगुनिया रूग्णांची तपासणी वाढवावी. नितीन अंबाडेकर यांनी बैठकीत साथरोगांच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

Continue reading

वारंवार हात धुऊन मात करा डोळे येण्याच्या संसर्गावर!

राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णांमध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे...
Skip to content