Homeबॅक पेजदेशात 81,938 तर...

देशात 81,938 तर महाराष्ट्रात 10,570 पशुंचे डॉक्टर!

भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 31-3-2023 पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. देशभरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची राज्यनिहाय आकडेवारी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये दिली आहे.

पशुसंवर्धन हा राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती राज्यांकडून आजाराच्या महामारीविज्ञानाच्या स्थितीनुसार आणि प्राण्यांच्या परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या गरजांच्या आधारे केली जाते. राज्याकंडून मिळालेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तुटवड्याचे प्रमाण बदलते आहे तर काही राज्यांमध्ये कोणताही तुटवडा नाही.

पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे राज्यांना अधिकार आहेत. राज्य सरकारांनी/ राज्य विद्यापीठांनी सुरू केलेल्या/ चालवण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांना, पशुवैद्यकीय शिक्षणामध्ये उच्च गुणवत्ता टिकवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने केलेल्या शिफारशींच्या आणि नियमांच्या आधारे मान्यता दिली जाते. तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खाजगी महाविद्यालयांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री परशोत्तम रुपाला यांनी लोकसभेत खासदार प्रीतम मुंडे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ANNEXURE I 

Sl. No.Name of State/UTNumber of Registered Veterinary Practitioners as on 31.03.2023
1Andaman & Nicobar59
2Andhra Pradesh5324
3Arunachal Pradesh232
4Assam3154
5Bihar3464
6Chhattisgarh1215
7Chandigarh13
8Dadar Nagar Haveli4
9Daman & Diu1
10Delhi466
11Goa222
12Gujarat4447
13Haryana2372
14Himachal Pradesh1402
15Jharkhand927
16Karnataka4786
17Kerala5172
18Lakshadweep34
19Madhya Pradesh3039
20Maharashtra10570
21Manipur561
22Meghalaya433
23Mizoram351
24Nagaland350
25Odisha2791
26Puducherry535
27Punjab4285
28Rajasthan4853
29Sikkim199
30Tamil Nadu6245
31Tripura451
32Uttar Pradesh6907
33Uttarakhand1156
34West Bengal2661
35Telengana2124
36Jammu & Kashmir1057
37Ladakha76
Total81938

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content