Homeबॅक पेजस्वातंत्र्यदिनी पर्यटकांची धार्मिक...

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांची धार्मिक स्थळांकडे धाव!

स्‍वातंत्र्यदिन जवळ आला असून यावेळी भारतीय पर्यटकांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठा वीकेण्‍डदेखील मिळणार आहे. यादरम्यान भारतीय पर्यटकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले असून आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याला त्यांचे प्राधान्य असल्याचे ट्रॅव्‍हल सर्च इंजिन कायकच्या फ्लाइट सर्च डेटामधून पाहायला मिळाले आहे.

पर्यटक

या सुट्टीमध्ये आध्‍यात्मिक संपन्‍न प्रवासाचा आनंद घेण्‍याकडे देशांतर्गत पर्यटकांचा कल असून टॉप ट्रेण्डिंग गंतव्‍यांच्‍या यादीमध्‍ये लोकप्रिय पर्यटन स्‍थळांपेक्षा स्‍थानिक ठिकाणांचा समावेश आहे. आहे. भारताची आध्‍यात्मिक राजधानी वाराणसीसाठी २०२२ च्‍या तुलनेत फ्लाइटच्‍या किंमतींमध्‍ये ७ टक्‍क्‍यांची वाढ झाली असताना देखील फ्लाइट शोधांमध्‍ये १०२ टक्‍क्‍यांची मोठी वाढ झाली आहे. सांस्‍कृतिकदृष्‍ट्या संपन्‍न प्राचीन शहर मदुराईसाठी देखील गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत फ्लाइटच्‍या किंमतींमध्‍ये २२ टक्‍क्‍यांची वाढ झाली असताना फ्लाइट शोधामध्‍ये ९७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

याव्‍यतिरिक्‍त गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत फ्लाइट शोधामध्‍ये सर्वाधिक वाढ दिसण्‍यात आलेल्‍या टॉप देशांतर्गत गंतव्‍यांमध्‍ये भुवनेश्‍वर (९० टक्‍के), तिरूवंनतपुरम (७१ टक्‍के) व कोची (५१ टक्‍के) यांचा समावेश होता. हे ट्रेण्‍ड्स पाहता स्‍पष्‍ट होते की, भारतीय देशातील वैविध्‍यपूर्ण व मोहक सांस्‍कृतिक ऑफरिंग्‍जचा अनुभव घेण्‍यासाठी या लाँग वीकेण्‍डचा आनंद घेत आहेत.

कायकचे भारतातील कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्‍हणाले की, आमच्‍या डेटामधून निदर्शनास येते की, भारतीय पर्यटक मदुराई, वाराणसी व भुवनेश्‍वर अशा ठिकाणी नवीन पर्यटन अनुभवांचा आनंद घेण्‍यास उत्‍सुक आहेत. अनेक भारतीय कोलंबो, ऑकलंड, जेदाह व टोरोण्‍टो अशा परदेशात प्रवास करण्‍यास उत्‍सुक आहेत. काही देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय टॉप ट्रेण्डिंग गंतव्‍यांच्‍या किमतीमध्‍ये लक्षणीय घट झाली आहे, ज्‍यामुळे भारतीय पर्यटक या गंतव्‍यांकडे अधिक आकर्षित झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाला लागून आलेला मोठा वीकेण्‍ड भारतीय हॉलिडेमेकर्ससाठी उत्‍साहवर्धक असणार आहे आणि कायक आकर्षक दरामध्‍ये सुट्टीची धमाल करण्‍याकरिता प्रवास करू इच्छिणाऱ्या पर्यटकांना उपयुक्‍त टिप्‍स व टूल्‍ससह मदत करण्‍यास सज्‍ज आहे. 

कोलंबो व ऑकलंडने फ्लाइट शोधांच्‍या बाबतीत टॉप ट्रेण्डिंग गंतव्‍यांच्‍या यादीमध्‍ये टॉप २ स्‍थान संपादित केले आहे, जेथे २०२२ च्‍या तुलनेत अनुक्रमे ५ पट व ४ पट वाढ झाली आहे. पर्यटकांच्‍या शोधांमध्‍ये या वाढीचे श्रेय गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत फ्लाइटच्‍या किंमतींमधील सरासरी घटला जाऊ शकते. श्रीलंकेमधील कोलंबोसाठी २०२२ पासून सरासरी फ्लाइट किंमतींमध्‍ये १० टक्‍क्‍यांची घट दिसण्‍यात आले आहे, तर न्‍यूझीलंडमधील ऑकलंडसाठी सरासरी फ्लाइट किंमतीमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत १६ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आंतरराष्‍ट्रीय हॉटेल्‍ससाठी किंमतींमध्‍ये जवळपास ४ टक्‍क्‍यांची घट झाली आहे, तर देशांतर्गत हॉटेल्‍ससाठी किंमतींमध्‍ये जवळपास २२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. लाँग वीकेण्‍डदरम्‍यान देशांतर्गत हॉटेलसाठी सरासरी किंमत ६,६८६ रूपये आहे आणि आंतरराष्‍ट्रीय हॉटेल्‍ससाठी सरासरी किंमत १४,८८५ रूपये आहे.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content