Homeटॉप स्टोरीविजय वडेट्टीवार विधानसभेचे...

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते?

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आले असतानाच काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा उमेदवार मिळाला असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तसे पत्र सुपूर्द केले आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक होण्याची शक्यता आहे.

वडेट्टीवार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तेव्हाचे विरोधी पक्षनेते अजित पवार शिंदे–फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी झाल्यामुळे काँग्रेसकडे  विरोधी पक्षनेतेपद चालून आले. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होऊन ते संपायला येईपर्यंत काँग्रेसच्या श्रेष्ठींना विरोधी पक्षेनेता कोण असावा याचा निर्णय घेता आला नव्हता. काँग्रेसच्या २८ आमदारांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी संग्राम थोपटे यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे वडेट्टीवार यांचे नाव जाहीर करण्यास उशिर झाल्याचे बोलले जाते.

वडेट्टीवार यांनी २०१९मध्ये काही महिने विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चार जून २०१९ रोजी पदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. यानंतर विजय वडेट्टीवार यांची २४ जून २०१९ रोजी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे २०१४ सालापासून प्रतिनिधित्व करतात. शिवसेनेत असलेले वडेट्टीवार नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content