Homeहेल्थ इज वेल्थजनऔषधी योजनेत नवीन...

जनऔषधी योजनेत नवीन उत्पादने आणि न्यूट्रास्युटिकल्स!

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे कार्यालयाने (PMBI), आपल्या यादीत डॅपाग्लायफ्लोझीन 10 मिलीग्राम, मेटफार्मिन हाइड्रोक्लोराइड (सावकाश पाझरणारे)1000 मिलीग्राम ही मधुमेहाच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे तसेच जन औषधी प्रोटीन (उच्च प्रथिने) पावडर, महिलांसाठी जन औषधी प्रोटीन पावडर (व्हे प्रोटीन पावडर) यासारख्या नव्या उत्पादनांचा समावेश केला आहे.

सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात 10,000 जन औषधी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात 30 जून 2023 पर्यंत एकूण 9512 जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेच्या (PMBJP) उत्पादन यादीमध्ये 1800 औषधे, 285 शस्त्रक्रिया उपकरणे आणि इतर उपभोग्य वस्तूंचा समावेश आहे. ही उत्पादने जन औषधी केंद्रात बाजाराच्या तुलनेत 50 % – 90 % सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. 

Sr.  No.Drug CodeMedicine NamePack SizeJan Aushadhi MRP in Rs.
12099Metformin Hydrochloride (Extended release) 1000mg and Dapagliflozin 10mg Tablets10’s55
22100Metformin Hydrochloride (Extended release) 500mg and Dapagliflozin 10mg Tablets10’s51
32240Diabetes Care Protein Powder400g Jar400
42241Renal care protein powder (Low Protein)400g Jar400
52242Renal care protein powder for dialysis patients (High Protein)400g Jar500
62246Janaushadhi Women Protein (Chocolate) 250g250g Jar230
72247Janaushadhi Women Protein (Vanilla) 250 gm250g Jar230
82248Janaushadhi Poshan with Cocoa 30gm30g Sachet10

मधुमेह आणि महिलांच्या आरोग्याची वाढती समस्या लक्षात घेऊन, जनऔषधी योजनेने आपल्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये खाली नमूद केलेल्या उत्पादनांचा प्रारंभ करून यादीत भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही उत्पादने सामान्य जनतेसाठी आधीपासूनच देशभरातील निवडक जन औषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content