Homeबॅक पेजहवामानाच्या अंदाजासाठी खाजगी...

हवामानाच्या अंदाजासाठी खाजगी क्षेत्राशी भागिदारी!

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सप्टेंबर 2021 मध्ये गुगल एशिया प्रा. लि. सोबत RA II प्रदेशात चक्रीवादळविषयक सूचनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि स्थाननिहाय पाऊसमानाचे भाकित करण्यासाठी नाऊकास्ट तंत्रज्ञान विकासाकरिता सामंजस्य करार केला. कृषी सेवा संबंधित हवामानाचा अंदाज आणि इशाऱ्याचे संदेश प्रसारित करण्यासाठी आयएमडी सार्वजनिक खाजगी भागीदारीचा वापर करत आहे.

स्वदेशी बनावटीचे रडार तयार करण्यासाठी विभागाकडून खाजगी क्षेत्राची मदत घेतली जात आहे. वादळ आणि वीज कोसळण्याशी संबंधित हवामान अंदाज  सेवांसाठी आयएमडी हवामान प्रतिरोधक निरीक्षण प्रणाली प्रोत्साहन परिषदेसोबत (CROPC) सहकार्याने काम करत आहे. विविध हवामान ऍप्लिकेशन्स आणि सेवांच्या विकासात पाठबळ देण्यासाठी भारतीय स्टार्टअप्सकडून प्रस्ताव मागवले आहेत.

“बॅरोमेट्रिक प्रेशर सेन्सरसह उपग्रहाने मागोवा घेणारा लॅग्रेन्जियन ड्रिफ्टर आणि इन्सॅट दळणवळण” यांचे राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेसोबत (NIOT) तंत्रज्ञान हस्तांतरणाने स्वदेशीकरण करण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र(INCOIS) ही आवश्यकतेनुसार खरेदी करणारी संस्था आहे. हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याची जास्त अचूकतेने माहिती मिळवण्यासाठी जुनी ऑप्टिकल ओडोलाईट आधारित पायलट बलून प्रणाली बदलून त्या जागी जीपीएस आधारित पायलट्सनोड प्रणालीचा वापर करण्याच्या शक्यतेची आयएमडीने चाचपणी केली आहे.माहिती गमावण्याचे प्रमाण कमी करण्याचे आणि हवामानाच्या भाकिताच्या सेवा आणखी सुधारण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. या व्यतिरिक्त देशात उत्पादित होणारी अनेक निरीक्षण उपकरणे (डॉप्लर हवामान रडार्स, स्वयंचलित पाऊस मापक इ.सारखी) सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाला पाठबळ देण्यासाठी, गरजेनुसार खरेदी केली जातात.

केंद्रीय भूविज्ञानमंत्री किरेन रिजीजू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content