Homeन्यूज अँड व्ह्यूजजुन्नरमध्ये साकारणार ८०...

जुन्नरमध्ये साकारणार ८० कोटींची बिबट सफारी!

जुन्नरमध्ये 80 कोटी रुपयांची एक बिबट सफारी उभारली जात आहे. उद्योग खात्याकडून वन जमिनीसाठी मिळणाऱ्या जागा कोकणामधलीच मिळत होती हे लक्षात आल्यानंतर आता कोकणातली जागा घ्यायची नाही असा निर्णय झालेला आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लक्ष रुपयाची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून २५ लक्ष रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास पाच लक्ष रुपयांची मदत तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास १ लक्ष २५ हजार रुपयांची मदत दिली जायची. आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीस कोणत्याही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाच लाखापर्यंतची मदत देण्यात येत आहे, असेही त्यांनी या संदर्भातले विधेयक मांडताना स्पष्ट केले. हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

बिबट

रानडुक्कर, रोडी आदींना मारण्यासाठी 24 तासात परवानगी मिळते आणि जर कधी एखादा प्राणी नुकसान करत असेल तर त्यावेळीला परवानगीची वाट न बघता त्याला मारता येते असेही मुनगंटीवार म्हणाले. वाघाची संख्या महाराष्ट्रात इतकी वाढली आहे की आता वाघांना आपण दुसऱ्या जंगलामध्ये पाठवण्याचा प्रयोग करू लागलो आहोत. यातला पहिला प्रयोग नागझिराला झाला आहे. सह्याद्रीच्या जंगलामध्येसुद्धा वाघाचा कॉरीडॉर करता येतो का, या दृष्टिकोनातून चाचपणी चालू आहे.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content