Homeबॅक पेजपीएम-कुसुम योजनेखाली 2.45...

पीएम-कुसुम योजनेखाली 2.45 लाख सौर ऊर्जा पंपाची उभारणी!

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान (PM- KUSUM), अर्थात पीएम-कुसुम योजने अंतर्गत 30 जून, 2023 पर्यंत प्रत्येकी 2 मेगावॅट क्षमतेच्या लहान प्रकल्पांसह एकूण 113.08 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत, या तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यासह देशभरात, 2.45 लाख सौर ऊर्जा पंप बसवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना परवडणारी वीज उपलब्ध करण्यासाठी, मार्च 2019 मध्ये पीएम-कुसुम योजना सुरु करण्यात आली आणि नोव्हेंबर 2020 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. ही योजना मागणीवर आधारित असून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या मागणीवर आधारित क्षमतांचे वितरण केले जाते.

पीएम-कुसुम योजनेमध्ये शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घ्यायच्या जमिनीची किंमत नमूद केलेली नाही. मात्र, 12.07.2023 रोजी जारी करण्यात आलेली सुधारित योजना मार्गदर्शक तत्त्वे, राज्यांना सध्याच्या ग्रीड-कनेक्टेड कृषी पंपांचे सोलरायझेशन (सौर-उर्जाकरण) आणि फीडर स्तरावरील सौर-ऊर्जा करणाद्वारे जमीन भाडेपट्ट्याचे दर जाहीर करण्याची परवानगी देतात.

नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content