Homeबॅक पेजमे महिन्यात ईएसआयमध्ये...

मे महिन्यात ईएसआयमध्ये 20.23 लाखांची नवी नोंदणी!

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) वेतनपटविषयक प्रारंभिक डेटावरून असे आढळून आले आहे की मे 2023 या महिन्यात 20.23 लाख नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.

मे 2023 या महिन्यात सुमारे 24,886 नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या आहेत आणि या आस्थापना कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या राज्य विमा महामंडळाच्या सामाजिक सुरक्षा छत्राखाली आणल्या गेल्या आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षेची हमी मिळालेली आहे. 

या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे की, देशातील तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत जसे की, मे 2023 या महिन्यात नव्याने नोंदणी झालेल्या एकूण 20.23 लाख कर्मचार्‍यांपैकी 25 वर्षे वयोगटातील 9.40 लाख कर्मचारी नवीन नोंदणीचा बहुतांश भाग आहेत आणि ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 47% एवढी आहे.

उपलब्ध वेतनपट डेटा लक्षात घेता त्याचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की, मे 2023 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 3.96 लाख एवढी होती. तसेच या डेटावरून असेही निदर्शनात आले की एकूण 71 ट्रान्सजेंडर कर्मचारी देखील मे 2023 या महिन्यात ईएसआय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झाले आहेत. यावरून हेच सिद्ध होते की कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आपले फायदे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. हा वेतनपट डेटा तात्पुरत्या स्वरूपातला आहे कारण डेटा निर्मिती ही एक सततची प्रक्रिया आहे. 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content