Homeबॅक पेजजीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत...

जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत अव्वल स्थानी!

संयुक्त अरब अमिरातीमध्ये अल एन येथे 3 जुलै ते 11 जुलै 2023 दरम्यान आयोजित 34व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (आयबीओ) 2023 मध्ये भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हे शक्य झाले सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमुळे, भारताने प्रथमच सुवर्ण कामगिरी करून आयबीओमध्ये पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

सुवर्ण कामगिरी करणारे या वर्षीचे विद्यार्थी 

  • ध्रुव अडवाणी (सुवर्णपदक) बंगळुरू, कर्नाटक
  • ईशान पेडणेकर (सुवर्णपदक) कोटा, राजस्थान
  • मेघ छाबडा (सुवर्णपदक) जालना , महाराष्ट्र
  • रोहित पांडा (सुवर्णपदक) रिसाली, छत्तीसगड

विद्यार्थ्यांच्या चमूसोबत प्रा. मदन एम. चतुर्वेदी (माजी वरिष्ठ प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठ) आणि डॉ. अनुपमा रोनाड (एचबीसीएसई, टीआयएफआर ) हे दोन प्रमुख आणि  डॉ. व्ही. बिनॉय (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बंगळुरू) आणि डॉ रामभादूर सुबेदी (एनआयआरआरएच, मुंबई) हे दोन वैज्ञानिक निरीक्षक होते.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 76 देशांतील 293 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत एकूण 29 सुवर्णपदके प्रदान करण्यात  आली. भारताव्यतिरिक्त केवळ सिंगापूर या देशाने या स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावली.

यापूर्वी, भारताने खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र (2008, 2009, 2010, 2011, 2015 आणि 2021 मध्ये), भौतिकशास्त्र (2018 मध्ये) आणि कनिष्ठ विज्ञान (2014, 2019, 2021 आणि 2022 मध्ये) पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content