Homeबॅक पेज'आयएसआय' मार्कशिवाय ठफन...

‘आयएसआय’ मार्कशिवाय ठफन ग्लास बनविणाऱ्या कारखान्यावर छापा!

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय-II च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने महाराष्ट्रातील मेसर्स फ्युचर सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज, R-27, TTC औद्योगिक क्षेत्र, रबाळे, MIDC रोड, नवी मुंबई – 400701, या कारखान्यावर 06.07.2023 रोजी अंमलबजावणी छापा टाकला. या कंपनीवर 08.05.2023 रोजी केलेल्या शोध आणि जप्ती कारवाई अंतर्गत तेथील वस्तू जप्त केल्यानंतरदेखील या कंपनीने आयएसआय मार्क प्रमाणीकरणाशिवाय स्थापत्य, इमारत आणि इतर सामान्य हेतूंसाठी वापरल्या जाणार्‍या सुरक्षा काचेचा एक प्रकार असलेल्या टफन ग्लासचे उत्पादन करणे सुरु ठेवल्याचे या छाप्यात उघडकीला आल्याचे शास्त्रज्ञ-एफ आणि प्रमुख, बी आय एस MUBO-II, संजय विज यांनी सांगितले.

सुरक्षा काच (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2022 (QCO) नुसार सर्व सुरक्षा काच IS 2553 नुसार बी आय एस प्रमाणित असतील आणि त्यावर वैध बी आय एस परवाना क्रमांकासह BIS मानक चिन्ह असणे बंधनकारक आहे. या छाप्यादरम्यान कंपनीत आढळलेली सुरक्षा काच, बी आय एस प्रमाणित नव्हती जे सुरक्षा काच (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2022 (QCO) चे उल्लंघन आहे. छाप्यादरम्यान अंदाजे 517 स्क्वेअर मीटर सामग्री सापडली असून त्यामुळे ही कंपनी सर्रास  बी आय एस प्रमाणपत्राशिवाय टफन ग्लास अर्थात सुरक्षा काचेचे उत्पादन करत असल्याचे स्पष्ट होते, जे बी आय एस कायदा 2016 च्या कलम 17(1) चे उल्लंघन आहे.

सुरक्षा काच (गुणवत्ता नियंत्रण) आदेशाचे उल्लंघन केल्यास बी आय एस कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास आणि किमान 2,00,000 रुपयांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

बी आय एस सर्व ग्राहकांना बी आय एस ने प्रमाणित केलेल्या अनिवार्य उत्पादनांची यादी शोधण्यासाठी BIS CARE ॲप (मोबाइल Android + IOS दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्याचे आवाहन करते. तसेच उत्पादन खरेदी करण्यापूर्वी बीआयएस ची वेबसाईट  http://www.bis.gov.in ला भेट देऊन वस्तूवरील आयएसआय मार्कची सत्यता तपासण्याची विनंती करते. याशिवाय जर एखादे वेळी नागरिकांना अनिवार्य उत्पादनांची विक्री बी आय एस प्रामाणिकरणाशिवाय होताना आढळल्यास त्यांनी त्वरित, हेड, MUBO-II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय, बी आय एस , 5वा मजला, CETTM, MTNL टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 (डॉ. एल एच हिरानंदानी हॉस्पिटल जवळ) या पत्त्यावर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे. याशिवाय hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारेही अशा तक्रारी करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.  

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content