Homeन्यूज अँड व्ह्यूजमुंबईत ड्युरंड चषक...

मुंबईत ड्युरंड चषक टूर आयोजित!

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ड्युरंड चषक फूटबॉल स्पर्धेच्या आगामी 132व्या स्पर्धेनिमित्त, मुंबईत नुकतीच मोठ्या उत्साहात ट्रॉफी टूर (चषक फेरी) आयोजित केली होती. यानिमित्त, कुलाबा इथल्या आर्मी ऑफीसर्स इन्स्टिट्यूट इथे तीन भव्य ड्युरंड चषकांचे स्वागत करण्यात आले. या समारंभाला पश्चिम नौदल विभागाचे ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ, व्हाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, आणि लेफ्टनंट जनरल एचएस कहलॉन, जीओसी, एचक्यू एमजी आणि जी एरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कुलाबा इथून ह्या चषकांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. त्यानंतर, ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह इथे त्यांना प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले होते.

यावेळी बोलताना, लेफ्टनंट जनरल एचएस काहलॉन म्हणाले, प्रतिष्ठित ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेच्या उत्सवात सहभागी होणे ही खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. भारतीय लष्कर कदाचित जगातील सर्वात मोठी क्रीडा प्रोत्साहक संस्था असेल, जागतिक स्तरावर भारतीय लष्कराच्या खेळाडूंची प्रशंसा झाली आहे. लष्करातील खेळाडू, संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणा आणि अभिमानाचा स्रोत आहेत. ड्युरंड चषक, फुटबॉलसाठीच्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच भारतीय फुटबॉल संघ एक भव्य  उंची गाठेल. भारतीय लष्कर आणि फुटबॉल संघाला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या 132व्या ड्युरंड चषक स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.

या स्पर्धेसाठीचे तीन चषक आहेत, ड्युरंड चषक (एक फिरता चषक आणि मूळ पारितोषिक ), शिमला चषक (हा ही एक फिरता चषक. 1904 मध्ये शिमल्याच्या रहिवाशांनी पहिल्यांदा दिला) आणि प्रेसिडेंट कप (पहिल्यांदा डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1956 मध्ये प्रदान).

याआधी, 30 जून 2023 रोजी ह्या चषकांना लष्करप्रमुख, हवाई दलप्रमुख आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांनी नवी दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून 17 शहरात परिक्रमा करण्यासाठी रवाना केले. हा चषक डेहराडून, उधमपूर आणि पुणे इथे जाऊन आल्यानंतर  मुंबई हा या दौऱ्यातील पाचवा मुक्काम आहे. 01 ऑगस्ट 2023 रोजी कोलकातामध्ये ध्वजांकित करण्यापूर्वी या दौर्‍यामध्ये जयपूर, कारवार, कोची, एझिमाला, बेंगळुरू, हैदराबाद, गुवाहाटी, कोक्राझार, शिलाँग आणि आयझॉल यांचा समावेश आहे.

132 वी ड्युरंड चषक स्पर्धा 3 ऑगस्ट 2023 पासून कोलकाता इथे सुरू होणार असून 3 सप्टेंबर 2023 ला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. ड्युरंड चषक स्पर्धेत एकूण 24 संघ असतील. आधीच्या स्पर्धेतील 20 संघ यावेळीही कायम आहेत, ज्यात ज्यात सर्व 12 इंडियन सुपर लीग (ISL) संघांचा समावेश आहे. त्याशिवाय, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ या शेजारी देशांतील संघ देखील सहभागी होणार असून 27 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर परदेशी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content