Homeबॅक पेजसूरत विमानतळावर 25...

सूरत विमानतळावर 25 कोटींचे 42 किलो सोने जप्त!

ऑपरेशन गोल्डमाइन अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर 48.20 किलो सोन्याची पेस्ट जप्त केली आहे. अलीकडच्या काळात विमानतळावरील ही सर्वात मोठी कारवाई आहे. प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण 48.20 किलो सोन्याच्या पेस्टमधून सुमारे 25.26 कोटी रुपये किमतीचे 42 किलोपेक्षा जास्त सोने (शुद्धता 99%) प्राप्त झाले आहे.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी 07.07.2023 रोजी शारजाहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX172 ने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात तस्करी करण्यासाठी पेस्ट स्वरूपात सोने घेऊन आल्याच्या संशयावरून 3 प्रवाशांना रोखले.

यावेळी या प्रवाशांच्या हातातील बॅगेज तसेच चेक-इन बॅगेजची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 5 काळ्या पट्ट्यांमध्ये लपवलेल्या 20 पांढऱ्या रंगाच्या पॅकेटमध्ये पेस्ट स्वरूपात लपविलेले 43.5 किलो सोने सापडले.

हे सोने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने भारतात तस्करी करण्यासाठी लपवण्यात आल्याचे प्रवाशांच्या चौकशीत उघड झाले. याशिवाय आणखी 4.67 किलो सोन्याची पेस्टही पुरुष स्वच्छतागृहातून जप्त करण्यात आली.

सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले त्या आधारे एका अधिकाऱ्यासह 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक संघटित तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. हे संपूर्ण जाळे मोडून काढण्याच्या उद्देशाने अशा प्रकरणांमध्ये विमानतळावरील अधिकाऱ्यांसह अन्य व्यक्तींचा सहभाग शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईमुळे तस्करी करणारी टोळी उघडकीला आली आहे. ही कारवाई म्हणजे देशात मौल्यवान वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाद्वारे सातत्याने सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content