Homeडेली पल्सभारतीय निवडणूक आयोगाचा...

भारतीय निवडणूक आयोगाचा आता पनामाशीही करार!

निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्याला संस्थात्मक रचनेची जोड देता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोग आणि पनामा देशातील निवडणूक न्यायाधिकरण यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गेल्या काही वर्षांत मेक्सिको, ब्राझील आणि चिलीसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्यावर, आयोगाने लॅटिन अमेरिकेत निवडणूक व्यवस्थापन संस्थेशी केलेला हा चौथा सामंजस्य करार आहे. जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी भारताने एकूण 31 सामंजस्य करार केले आहेत.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय शिष्टमंडळाने, पनामाच्या निवडणूक न्यायाधिकरणाचे पीठासीन दंडाधिकारी अल्फ्रेडो जंका वेंडेहाके यांच्याशी संवाद साधला. दोन देशातील निवडणूक व्यवस्थापन संस्थामधील सहकार्य आणि ज्ञानाचे आदानप्रदान अधिक वाढवण्याविषयी ही चर्चा होती. पनामा न्यायाधिकरणाचे प्रथम उपाध्यक्ष दंडाधिकारी एडुआर्डो वाल्देस एस्कोफरी आणि द्वितीय उपाध्यक्ष लुईस ए. गुएरा मोरालेस हे देखील उपस्थित होते.

हा सामंजस्य करार जगभरातील निवडणूक संस्थांशी संलग्न होण्यासाठी आणि जगभरातील लोकशाही प्रक्रियांना बळकट करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो, असे राजीव कुमार यावेळी म्हणाले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धतींमधून शिकताना भारतीय निवडणूक आयोग मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका आयोजित करण्यासाठी त्याच्याकडे असलेली कौशल्ये आणि ज्ञान इतर देशांतील आपल्या समकक्षांशी सामायिक करण्यासाठी वचनबद्ध आहे. असे ते म्हणाले.  निवडणुकीत तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांच्या वापराविषयी दोन आयोगांमध्ये असलेल्या सहकार्याविषयी अल्फ्रेडो यांनी चर्चा केली.

भारताचा निवडणूक आयोग आंतरराष्ट्रीय सहकार्य कार्यक्रमाद्वारे परदेशी निवडणूक व्यवस्थापन संस्थांशी संबंध आणि सहकार्य वाढवत आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content