Homeन्यूज अँड व्ह्यूजआयआयटी मद्रासचा पहिला...

आयआयटी मद्रासचा पहिला परदेशी शैक्षणिक कॅम्पस टांझानियात!

भारतातील आयआयटी मद्रासचा विभाग, टांझानियाच्या झांझिबार इथे स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. भारत सरकारचा शिक्षण विभाग, आयआयटी मद्रास आणि झांझिबार इथले शिक्षण प्रशिक्षण विभाग तसेच त्यांचे शिक्षण मंत्रालय, यांच्यात हा करार झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, झांझिबारचे अध्यक्ष हुसेन अली म्विनी, यांच्या उपस्थितीत हा करार झाला. आयआयटीचा हा भारताबाहेरील हा पहिलाच परिसर असेल. हा करार म्हणजे, भारत आणि टांझानिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीचे प्रतिबिंब आहे. संपूर्ण आफ्रिका आणि ग्लोबल साउथमध्ये लोकांशी संबंध निर्माण करण्यावर भारताने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

आयआयटी मद्रास झांझिबार कॅम्पस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे हा उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक प्रारंभ आहे, अशी भावना, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

टांझानिया येथील भारताचे उच्चायुक्त बिनया श्रीकांता प्रधान, आयआयटी मद्रासचे अधिष्ठाता (ग्लोबल एंगेजमेंट) प्रा.रघुनाथन रेंगास्वामी, आणि झांझिबारचे कार्यकारी प्रधान सचिव खालिद मसूद वजीर यांनी दोन्ही सरकारांच्या वतीने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आंतरराष्ट्रीयीकरणावर लक्ष केंद्रित करत असून, या अंतर्गत उच्च कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यापीठांना इतर देशांमध्येही परिसर स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. झांझिबार टांझानिया मधील आयआयटी परिसराची कल्पना जागतिक दर्जाची उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणून केली गेली आहे. ज्यामध्ये उदयोन्मुख जागतिक गरजांना प्रतिसाद देण्यासाठी क्षमता विकसित करणे, राष्ट्रांमधील संबंध दृढ करणे आणि या क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पना यांना समर्थन देणे हे या कराराचे व्यापक ध्येय आहे. भारतीय उच्च शिक्षण आणि नवोन्मेषाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचे दर्शन या उपक्रमामुळे जगाला घडेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content