Homeटॉप स्टोरीएमपीएससीच्या विविध संवर्गाच्या...

एमपीएससीच्या विविध संवर्गाच्या परीक्षांचा निकाल जाहीर

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध संवर्गांसाठी घेतलेल्या परीक्षांचे निकाल घोषित केले आहेत.

दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ करिता दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून दुय्यम निबंधक (श्रेणी- १) / मुद्रांक निरीक्षक (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आज ६ जुलै, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरिता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता राज्य कर निरिक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून राज्य कर निरिक्षक (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आज ६ जुलै, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरिता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक परिक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता पोलीस उपनिरिक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पोलीस उपनिरिक्षक (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ५ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरीता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक ५ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत, विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्वपरिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परिक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content