Homeटॉप स्टोरीसमान नागरी कायद्याला...

समान नागरी कायद्याला शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सूतोवाच केले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असून शिवसेनेचा समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठींबा असल्याचे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी, खासदार धैर्यशील माने आणि हेमंत पाटील हेदेखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. आजचा हा दिवस आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा दिवस साजरा करत आहोत. निष्ठावान शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने पूर्ण झाली आहे. राम मंदिरची निर्मिती करणे, कलम ३७० रद्द करणे व समान नागरी कायदा बनवणे ही बाळासाहेबांची तीन स्वप्ने  होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहेत. समान नागरी कायदा लवकरच येईल. शिवसेनेचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या एक राष्ट्र, एक कायदा, या संकल्पनेशी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच या कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे शिष्टमंडळ नुकतेच उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी सेना भवनमध्ये गेले होते. उद्धव ठाकरे मुस्लिमांना पाठिंबा देतील असा विश्वास मुस्लिमांना आहे. या कायद्यामुळे हिंदूना त्रास सहन करावा लागेल, असे ते म्हणत आहेत, मात्र प्रत्यक्षात हा कायदा हिंदूंना प्रभावित करणार नाही तर फक्त गांधी कुटुंबाला प्रभावित करेल. त्यामुळे उद्धव ठाकरे या कायद्याला विरोध करत आहेत, अशी टीका शेवाळे यांनी केली.

समान

या कायद्याच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचे व बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. हा कायदा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून प्रत्येकाला त्यांची ओळख विचारात न घेता समान वागणूक देईल. हा कायदा मंजूर होण्यासाठी आम्ही व्हीप जारी करू, असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा देशात समान नागरी कायदा करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसमुळे गेली 75 वर्षे समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, हे दुर्दैवी आहे. देशातील प्रत्येक नागरिकांसाठी व सर्व महिलांसाठीदेखील हा कायदा अत्यंत चांगला आहे. संसदेत हे विधेयक मांडल्यावर शिवसेना त्याला पाठिंबा देईल. तसेच, राज्य विधिमंडळात आगामी पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ ठराव मांडावा व केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

खरे पाहता मुस्लिम महिलांसाठी हा कायदा अत्यंत लाभदायक ठरेल. या विधेयकामुळे महिलांचे रक्षण होईल व त्यांच्यासाठी हा कायदा वरदान ठरेल, असा दावा त्यांनी केला. मुस्लिम महिलांना सुरक्षित करणारा हा कायदा ठरेल. देशाचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम यांनीदेखील समान नागरी कायद्याचे समर्थन केले होते. केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव मांडावा व विधेयक मंजूर करावे अशी विनंती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सर्व पक्षांनी या कायद्याला पाठिंबा द्यावा, धार्मिक रंग देऊ नये, गैरसमज पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content