Homeबॅक पेज16 राज्यांच्या 56...

16 राज्यांच्या 56 हजार कोटींच्या प्रस्तावांना केंद्राची मंजुरी!

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने चालू आर्थिक वर्षात 16 राज्यांमध्ये 56,415 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य 2023-24’ या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. राज्यनिहाय मंजूर रक्कम खालीलप्रमाणे आहे.

Sl. No.StateAmount Approved
(Rs. in crore)
1Arunachal Pradesh1255
2Bihar9640
3Chhattisgarh3195
4Goa386
5Gujarat3478
6Haryana1093
7Himachal Pradesh826
8Karnataka3647
9Madhya Pradesh7850
10Mizoram399
11Odisha4528
12Rajasthan6026
13Sikkim388
14Tamil Nadu4079
15Telangana2102
16West Bengal7523

आरोग्य, शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, पूल आणि रेल्वे यासह विविध क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या क्षेत्रांतील जल जीवन मिशन आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची गती वाढावी या उद्देशाने या दोन्ही योजनेतील राज्यांचा वाटा पूर्ण करण्यासाठीही  निधी राज्यांना प्रदान करण्यात आला आहे.

भांडवली खर्चाचे अनेक पटीत होणारे परिणाम लक्षात घेऊन आणि राज्यांद्वारे केल्या जाणाऱ्या भांडवली खर्चाला चालना देण्यासाठी, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य 2023-24’ ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकारांना 2023-24 या आर्थिक वर्षात 50 वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या रूपात एकूण 1.3 लाख कोटी रुपयांची विशेष मदत देण्यात येत आहे. 

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content