शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या ‘पाऊलखुणा विकासाच्या’ या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन आज शिवसेना भवन येथे करण्यात आले.

यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी महापौर श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला संघटक शालिनी सावंत, रचना सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, जयवंत लाड, बाळा साटम, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, संदिप गाढवे, बाळा तावडे, उपविभाग संघटक दिपाशा पवार, उपविभाग समन्वयक उत्तरा नायर, मयुरी रवाळे, कालिदास कांदळगावकर, उमेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छत्री वाटप कार्यक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.

