Homeबॅक पेजआयथिंक लॉजिस्टिक्सच्या संकेतस्थळावर...

आयथिंक लॉजिस्टिक्सच्या संकेतस्थळावर ‘डार्क मोड’चा पर्याय!

भारतातील २६,०००हून अधिक पिन कोड पत्त्यांवर माल पोहोचता करणारा, डी२सी कंपन्यांसाठीच्या इत्यंभूत गरजा पुरविणारा, मल्टिपल कुरियर शिपिंग प्लॅटफॉर्म आयथिंक लॉजिस्टिक्सने आपल्या डॅशबोर्डवर ‘डार्क मोड’ ही नवीन सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे. या नव्या सोयीमुळे यूजर्सना पांढऱ्या पार्श्वभूमी आणि गडद पार्श्वभूमी असलेल्या इंटरफेसमधून आपल्या आवडीचा इंटरफेस निवडता येणार आहे. कंपनीद्वारे आपल्या प्लॅटफॉर्मवर हा नवा बदल करण्यात आला आहे आणि ही सुविधा ग्राहकांना आणि या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्या इतर व्हिजिटर्ससाठी खुली झाली आहे.

डार्क

ही नवीन सुधारणा ताज्या ट्रेण्डनुसार तर आहेच, पण त्याचबरोबर यूजर्सचे आयुष्य आणि स्वास्थ्य अधिक चांगले बनविण्याचा हेतूही त्यामागे आहे. या अपडेटचे काही प्रमुख लाभ म्हणजे त्यामुळे वेबसाइटवरील अक्षरे अधिक चांगल्या प्रकारे वाचता येण्‍यासाठी झाली आहेत. डार्क मोडचा पर्याय निवडल्यावर यूजर्सना फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी करता येते, डोळ्यांवरचा ताण दूर होतो, स्क्रीन चमकत नसल्याने त्यामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता दूर होते व त्यांना आपल्या कामावर लक्ष एकाग्र करता येते. आयथिंकचा डॅशबोर्ड खूप तासांसाठी वापरणाऱ्या यूजर्सना याचा विशेष फायदा होणार आहे. डार्क मोडचे आरोग्यासाठी आणखी काही फायदे आहेत. जसे की यामुळे वारंवार डोकेदुखी होत नाही आणि नील प्रकाशकिरणांचा त्वचेवर नगण्य परिणाम होतो, त्यातून यूजर्सच्या झोपेच्या दर्जामध्ये सुधारणा होते. अंधारे वातावरण असल्यास अधिक चांगली झोप लागते असे संशोधनांतून सातत्याने दिसून आले आहे.

रंग आणि दृश्य घटक उठून दिसत असल्याने यूजर्सना स्क्रीनवरील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फरक करणे सोपे जाते. यामुळे अधिक चांगला कॉन्स्ट्रास्ट लूक मिळतो व यूजर्सच्या अनुभवातही सुधारणा होते. फोनबफद्वारे घेण्यात आलेल्या आयफोन यूजर्सच्या पाहणीनुसार डार्क मोड वापरणारे एखादा व्हिडिओ २० तासांसाठी चालवू शकले, त्या तुलनेत व्हाइट मोड वापरणाऱ्यांना फक्त १५ तास व्हिडिओ पाहता येतो. यातून कोणत्याही त्रासाशिवाय अधिक काळासाठी डिव्हाइस वापरण्याच्या बाबतीत डार्क मोडमध्ये असलेले संभाव्य फायदे अधोरेखित होतात.

यूजर्सना डार्क मोड निवडण्याचा पर्याय पुरवणे ही कंपनीसाठी एक उत्साहवर्धक बाब आहे, कारण तो दृश्यात्मकरित्या अधिक आरामदायी अनुभव देऊ करतो, डोळ्यांवरचा ताण कमी करतो, उपकरणाचा अधिक काळ वापर होण्याची शक्यता वाढते आणि इतकेच नव्हे तर झोपेचा दर्जा सुधारण्यामध्येही याची मदत होते. या अपडेटमुळे आमच्या यूजर्सच्या अनुभवात आणि एकूणच स्वास्थ्यामध्ये मोठी सुधारणा घडून येईल याची आयथिंक लॉजिस्टिक्सला खात्री आहे.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content