Homeटॉप स्टोरीमनीषा कायंदे, शिशिर...

मनीषा कायंदे, शिशिर शिंदेंचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’!

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला धक्का देताना विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, माजी आमदार शिशिर शिंदे तसेच माजी नगरसेवक तांडेल दांपत्यानेही आज जय महाराष्ट्र केला. हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन गोरेगावच्या नेस्को येथे होणार असून त्यात हे प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यापासून आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. आज उद्धव ठाकरेंनी वरळीच्या एनएसआयई स्टेडियमनमध्ये पदाधिकाऱ्यांचे एका दिवसाचे शिबीर घेतले होते. त्याआधीच त्यांच्या गटाला हादरे बसायला सुरूवात झाली.

आमदार मनीषा कायंदे मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या अनेक वर्षे नगरसेविका होत्या. २००९ साली त्या भाजपाकडून सायन कोळीवाड्यातून विधानसभेची निवडणूक लढल्या होत्या. त्यात त्यांचा पराभव झाला. २०१२ साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१८ साली त्या विधान परिषदेवर निवडून गेल्या. येत्या जुलै महिन्यात त्यांचा कार्यकाल संपत आहे.

काल शिवसेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले व चार वर्षांपूर्वी पुन्हा शिवसेनेत परतलेले शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. चार वर्षे आपल्याला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. नंतर आपल्याला शोभेचे पद देण्यात आले. त्यामुळे आपल्या आयुष्यातील चार वर्षे वाया गेल्याचे शिशिर शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे.

चुनाभट्टीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तांडेल दांपत्यानेही ठाकरे गट सोडला आहे. तेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे बोलले जाते.

ठाकरे गटातही गटबाजी

दरम्यान, वरळीत ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांचे शिबीर चालू असताना तेथील आमदार सुनील शिंदे यांनी लावलेले पोस्टर्स ठाकरे गटाच्याच सचिन अहिर यांच्या समर्थकांनी फाडल्याची चर्चा जोरात होती. त्यामुळे आता ठाकरे गटात राहिलेल्या नेत्यांमध्येही गटबाजी जोर धरू लागली की काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

शिवसेनेचा उद्या गोरेगावात वर्धापनदिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा वर्धापनदिन उद्या गोरेगावच्या नेस्को सभागारात होत असून यावेळी अनेक पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातले अनेक माजी नगरसेवक यावेळी शिवसेनेची कास धरणार असल्याचे बोलले जाते.

काही हजारांची क्षमता असलेल्या या सभागारात खुर्च्या मांडण्यात येणार असून त्यासाठी गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही शिंदेंकडून होणार आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पक्षबांधणी तसेच या मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक आमदार, खासदार तसेच शाखाप्रमुख व माजी नगरसेवकाला कार्यकर्त्यांचा कोटा ठरवून देण्यात आला असून त्यात मुंबई व ठाणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.

या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने काही मिनिटांचा टीझरही तयार केला असून काही दिवसांपासून त्याद्वारे या मेळाव्याची जाहिरातही केली जात आहे. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघेंचा प्रमुख्याने उल्लेख करण्यात आला आहे.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content