Homeटॉप स्टोरीतुम्ही सावरकर, हेडगेवारांना...

तुम्ही सावरकर, हेडगेवारांना वगळले.. आम्ही नेहरूंना!

कर्नाटकातल्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने शालेय पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडे काढून टाकल्याला आठवडाही उलटत नाही तोच केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीप्रणित नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसचे आधारस्तंभ, भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव दिलेल्या दिल्लीतल्या संग्रहालयाच्या नावातून नेहरूंना वगळण्याचे काम केले आहे. नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय  सोसायटीच्या विशेष बैठकीत, नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीचे नाव बदलून ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोसायटीचे उपाध्यक्ष असलेल्या संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

पंतप्रधान मोदी यांनी  2016 मध्ये, नवी दिल्लीतील तीन मूर्ती परिसरात भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित संग्रहालय उभारण्याची संकल्पना  मांडली होती. नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीच्या कार्यकारी परिषदेच्या  25-11-2016 रोजी झालेल्या 162 व्या बैठकीत तीन मूर्ती इस्टेट परिसरामध्ये सर्व पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाला आणि 21 एप्रिल 2022 रोजी प्रधानमंत्री संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. 

त्यानंतर कार्यकारी परिषदेला असे वाटले की, स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या सामूहिक प्रवासाचे चित्रण करणारे आणि राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान अधोरेखित करणारे अशा सध्याच्या उपक्रमांना प्रतिबिंबित करणारे संस्थेचे नाव असले पाहिजे. हे संग्रहालय नूतनीकरण केलेल्या आणि पुन्हा दुरुस्ती केलेल्या नेहरू संग्रहालय इमारतीपासून सुरू होते आणि ते आता जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन आणि योगदानावर आधारित तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक प्रदर्शनांसह पूर्णपणे अद्यतनित आहे. एका नवीन इमारतीत असलेले हे संग्रहालय आपल्या सर्व पंतप्रधानांनी विविध आव्हानांना तोंड देत देशाची वाटचाल कशाप्रकारे  केली आणि देशाची सर्वांगीण प्रगती कशाप्रकारे केली याची गाथा सांगते. अशा प्रकारे हे संग्रहालय सर्व पंतप्रधानांचे कार्य अधोरेखित करत संस्थात्मक स्मृतींचे लोकशाहीकरण करते.

कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्वागतपर भाषण करत, पंतप्रधान संग्रहालय देशाची लोकशाहीप्रती असलेली दृढ वचनबद्धता व्यक्त करते आणि त्यामुळे संस्थेच्या नावामध्ये त्याचे नवीन स्वरूप प्रतिबिंबित झाले पाहिजे यावर भर देऊन नाव बदलण्याची गरज स्पष्ट केली.  

आपल्या नव्या स्वरूपातील ही संस्था जवाहरलाल नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे योगदान आणि त्यांच्यासमोरील विविध आव्हानांना त्यांनी दिलेल्या प्रतिसादांचे दर्शन घडवते, असे सांगत सोसायटीचे उपाध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात नाव बदलण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले. सर्व पंतप्रधानांना समर्पित म्हणून या संस्थेचे  वर्णन करून विविध पंतप्रधानांच्या प्रवासाची तुलना इंद्रधनुष्याच्या विविध रंगांशी करत इंद्रधनुष्य सुंदर होण्यासाठी त्याचे सर्व रंग प्रमाणानुसार क्रमाने दर्शविले पाहिजेत यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. अशाप्रकारे नवीन नाव देण्याचा हा ठराव असून आपल्या पूर्वीच्या सगळ्या पंतप्रधानांचा आदर यात आहे आणि याच्या आशयामध्ये लोकशाही आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content