Homeबॅक पेजउद्धव ठाकरे यांनी...

उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडले होते….

उद्धव ठाकरे यांनी सांगितले असणार राणेंना बोलवू नका म्हणून… मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलेले होते. हॉलिडे इनमध्ये जाऊन कुटुंबासह राहिलेले आहेत. पण दोनदाही मी साहेबांना तयार करून त्यांना घरी आणले हॉलिडे इनमधून… एकच धमकी साहेबांना असायची. घर सोडायची…, असे उद्गार केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढले आहेत.

नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली. या मुलाखतीतले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी…

अवधूत गुप्ते आणि आता मित्रहो… वेळ झाली आहे रॅपिड राऊंडची. राजकारणात जास्त आश्वासक कोण वाटतं? निलेश राणे की नितेश राणे?

नारायण राणे नितेश…

अवधूत गुप्ते- शिवसेना सोडून गेलेल्या कुठल्या नेत्याचे बंड व्यावसायिक स्वार्थासाठी नव्हतं?  छगन भुजबळ, नारायण राणे की एकनाथ शिंदे…

नारायण राणे- —-

अवधूत गुप्ते- इथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये काही वस्तू असतील. त्या भेटवस्तू आहेत असे समजून त्या तुम्ही कोणाला द्याल हे आम्हाला सांगायचं. श्रीफळ… कुणाला द्याल?

नारायण राणे- यांना देऊया ना… अनिल परबना…अवधूत गुप्ते- अरे वाss… डायरेक्ट सिंधुदूर्गचे रेल्वेचे तिकीट आहे. हे तिकीट देऊन कोणाला कोकणात आमंत्रण द्यायला आवडेल?

——-

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content