Homeटॉप स्टोरीमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ऑईल...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ऑईल टँकरला भीषण आग !

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळ्याजवळील ओव्हर ब्रिजवर मंगळवारी ऑईल टँकरला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत , अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली. यामुळे रस्त्यावर मोठी आग लागली असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. एक्स्प्रेस वेच्या एकाच बाजूचा वापर केला जात असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून सध्या लोणावळा शहरातून वाहतूक वळवण्यात आली आहे. द्रूतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उलटलेल्या टँकरपासून सुमारे 10 फूट उंचीवर आगीच्या मोठ्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. या घटनेत सांडलेल्या तेलामुळे लागलेली आग पुलाच्या खालीही दिसत आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content