Homeपब्लिक फिगरथकलेले कोट्यवधींचे भाडे...

थकलेले कोट्यवधींचे भाडे मिळणार तरी कधी?

मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरातील गोळीबार एसआरए योजनेतील प्रकल्पग्रस्त गरीबांना त्यांचे थकलेले कोट्यवधी रूपयांचे भाडे कधी मिळणार, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला.

झिशान सिद्दीकी यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्न विचारताना नितेश राणे म्हणाले की, कोट्यवधी रूपयांचे भाडे थकवण्याइतकी वाईट परिस्थिती सदर विकासकाची नाही. हा लहान बिल्डर नाही. सध्याची मार्केटची स्थिती त्याला लागू पडत नाही. त्याचे अन्य प्रोजेक्ट चालू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे भाडे थकवणे ही या बिल्डरची मस्ती आहे. त्यामुळे तातडीने त्यावर कारवाई करून त्याला भाडे देण्यास भाग पाडावे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याला उत्तर दिले. याबाबत आपण लवकरात लवकर विकासक, म्हाडा तसेच एसआरएचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक बोलावू आणि प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर थकलेले भाडे देण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी दिले.

त्याआधी झिशान सिद्दीकी यांनी कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी विकासक बदलण्याची तसेच प्रकल्पग्रस्त भाडेकरूंचे थकलेले सुमारे १२ कोटी भाडे देण्यास विकासकाला भाग पाडण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना आव्हाड यांनी सांगितले की, ३-के नियमाखाली सुरू झालेल्या काही सुरूवातीच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. तो रद्द करणे योग्य होणार नाही. निश्चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांचे थकलेले भाडे मिळण्यासाठी आपण एक संयुक्त बैठक बोलावू.

एसआरए व म्हाडाची गंगाजळी रिकामी

आशिष शेलार यांनी हा प्रकल्प एसआरएने पूर्ण करावा. तसेच इतरत्रही रखडलेल्या प्रकल्पांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, नवे प्रकल्प राबविण्याची ताकद एसआरएकडे नाही. म्हाडाही, याला दे, त्याला दे करत रिकामी झाली आहे. अशा स्थितीत एक नवा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. अशा योजना म्हाडा आणि एसआरए एकत्रितपणे राबवतील. प्रकल्पग्रस्तांसाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम म्हाडा आणि एसआरए करेल आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा लीलाव केला जाईल. वांद्रे ते कुलाब्याच्या बधवार पार्कपर्यंत अशाप्रकारे योजना राबविल्या जातील. त्यामुळे म्हाडा आणि एसआरएकडे भरपूर पैसा येईल.

योगेश सागर यांनी, असा प्रयोग करताना आपले मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. सावध राहवे, असा सल्ला दिला आणि एकच हंशा पिकला.

Continue reading

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...

१३ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यात!

एप्रिल महिना संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून मे महिन्याला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सर्व) कॅलेंडरनुसार, मे २०२६मध्ये...

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....
Skip to content