Homeटॉप स्टोरीआता सरकारी शाळांमधली...

आता सरकारी शाळांमधली मुले दिसणार एकाच गणवेशात!

राज्य सरकारी शाळांमधून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश, या योजनेची अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरवले असून यावर्षापासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या निर्णयापूर्वीच काही शाळांनी कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने तेथील विद्यार्थी आठवड्यातून तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ‘एक रंग एक गणवेश’ धोरण यावर्षी राबवले जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघा एक महिना राहिला असताना शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत ‘एक रंग एक गणवेश’ धोरणाबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत ११ मे रोजी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

आता खासगी शाळांनीही विचार करावा लागेल. याबाबत शैक्षणिक संस्थांसोबत आपण बैठक घेणार आहोत. त्यांनाही आम्ही मोफत पुस्तक व गणवेश देऊ. एक गणवेश करण्यामागे शिस्त लागते. या एक गणवेशामागे कुठलाही आर्थिक हेतू नाही. यासाठी कंत्राट निघणार. कुणीही त्यात भाग घेऊ शकते. याबाबत कुठल्याही कंपनीशी संगनमत करण्यात आलेले नाही. मुलांना दर्जेदार कपडे मिळतील. बूट मिळतील. राज्यातील शासकीय शाळांकडे मुलाची ओढ वाढेल, असेही केसरकर म्हणाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content