Homeहेल्थ इज वेल्थविलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात...

विलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवा सुरू!

मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय येथे एन्डोस्कोपी सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे अत्याधुनिक पद्धतीने पोटाच्या विकारांचे निदान करणे शक्य होणार आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल तसेच अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या निर्देशाने मुंबईकरांना अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विलेपार्ले स्थित ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. कूपर रुग्णालय येथे शल्यचिकित्सा विभागाच्या वतीने एन्डोस्कोपी सेवा सुरू करणे, हा त्याचाच एक भाग आहे. या एन्डोस्कोपी सेवेचे लोकार्पण शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रख्यात एन्डोस्कोपिस्ट डॉ. मोहन जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी डॉ. कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेष मोहिते, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर आणि शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. स्मृती घेटला यांची उपस्थिती होती.

डॉ. मोहन जोशी यांनी ‘एन्डोस्कोपी कशी करावी’ या विषयावर वैद्यकीय विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. एन्डोस्कोपी ही पोटाच्या विकारांचे निदान करण्यासाठी केली जाणारी अत्याधुनिक प्रक्रिया आहे. या अंतर्गत अत्यंत सूक्ष्मपणे पाहू शकणारी दुर्बिण ही एन्डोस्कोपच्या मदतीने शरीराच्या नैसर्गिक छिद्रांतून शरीरात सोडली जाते. एन्डोस्कोप ही एक लांब, पातळ आणि लवचिक नलिका असते. या नलिकेच्या पुढील बाजूस उच्च क्षमतेचा कॅमेरा असतो. त्या माध्यमातून पोटातील विविध अवयवांच्या प्रतिमा डॉक्टरांना संगणक किंवा अन्य पटल (स्क्रिन) वर बघता येतात. याद्वारे वैद्यकीय तज्ज्ञांना विविध आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते. कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवा सुरू झाल्याने येथे येणाऱ्या विशेषतः पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठी मदत होणार आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content