Homeमाय व्हॉईसकाँग्रेसमध्येही अस्वस्थता... फक्त...

काँग्रेसमध्येही अस्वस्थता… फक्त गोळाबेरीज होत नाही!

आज राष्ट्रवादीत अजित पवारांपासून अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती आहे. मात्र त्यांची गोळाबेरीज जमत नाही म्हणून ते थांबले आहेत, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला.

अजित पवारांची अस्वस्थता आजची नाही. पार्थ पवार यांच्या पराभवापासूनच अजितदादा नाराज आहेत. महाविकास आघाडीमध्ये दादांना स्थान नाही. नागपूरच्या वज्रमुठ सभेतही त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडत असावेत, असे ते म्हणाले.

अजित पवार हे ताकदवर नेते आहेत. ते राष्ट्रवादी सोडून जर भाजप किंवा आमच्या पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र ते जर राष्ट्रवादीला घेऊन सत्तेत येत असतील तर आम्ही सत्तेत राहणार नाही, असेही शिरसाट यांनी सांगितले. राहुल गांधी मातोश्रीवर कधीही जाणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content