Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच...

उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच राहुल गांधी ‘मातोश्री’वर!

उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काल काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

स्वा. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये, पक्षाच्या इतर नेत्यांकडून होणारे त्याचे समर्थन, सावरकरांबद्दल उद्धव ठाकरे गटाची भूमिका, अशा विविध परस्परविरोधी भूमिकांचा महाविकास आघाडीवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी काल रात्री वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर वेणूगोपाल तसेच उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी वेणूगोपाल यांना राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत विचारले असता त्यांनी इतक्यात ही भेट होण्याची शक्यताच नसल्याचे सूचित केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी यावे. तसे निमंत्रण आम्ही त्यांना दिले आहे. त्यांची दिल्लीवारी झाल्यावर राहुल गांधी निश्चितच मुंबई गाठतील, अशा आशयाचे विधानही वेणूगोपाल यांनी केले. 

मीकरणाविरोधातील समीकरण – उद्धव ठाकरे

यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपाल यांनी स्पष्ट केला. देशात मीकरणाच्या विरोधात एक समीकरण म्हणून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात. म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत.

मागे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास आहे. ते सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो. एक नाते निर्माण होते. भाजपसोबत २५-३० वर्षं होतो. पण होतो… त्यांना किंमत नव्हती. ठिक आहे. त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत. ते आम्हाला साथ देतील, असेही ठाकरे म्हणाले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content