Homeएनसर्कलभाईंदर, उत्तनपासून ठाण्याच्या...

भाईंदर, उत्तनपासून ठाण्याच्या राखीव वनजमीनींबद्दल आक्षेप

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या अंतर्गत मुंबई कांदळवन संधारण घटकांतर्गत अधिसूचित राखीव वन घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात अपप्रवेश करणे आणि इतर कृत्ये करण्याची मनाई करण्यात आली आहे. मुंबई कांदळवन संधारण घटकाचे विभागीय वन अधिकारी यांनी हे राखीव वन घोषित केले आहे. कारण भाईंदर, उत्तनपासून ते ठाण्यापर्यंतच्या राखीव वनजमीनींबद्दल आक्षेप घेण्यात आले आहेत. भाईंदर ते ठाणेपर्यंत तब्बल एक हजार 387 हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचीच आहे. त्याची मोजणी करण्याचे काम सुरु आहे. न्यायालय सांगेपर्यंत ही राखीव वनजमीन फॉरेस्टच्याच ताब्यात असणार असल्याचे वरिष्ठ वन अधिकारी यांनी सांगितले.

सध्या काही जमीनींवर स्मशानभमी असून तर काही जुनी कागदपत्रे महापालिकेकडे असल्याची माहिती त्यांनी दिली. मीरा भाईंदरकडे सहा/ सात सर्व्हे असून, काही बांधकामांचे प्रस्ताव वगळण्यासाठीही आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. भाईंदर, उत्तनपासून ते ठाण्यापर्यंतच्या राखीव वनजमीनींबद्दल काही लोकांनी त्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला असला असून, ठाणे तालुक्याबद्दल 58 लाख रुपये सरकारकडे जमा करण्यात आले, अशी माहिती वन विभागाच्या अधिका-यांनी दिली. शिकार, खोदकाम, अतिक्रमण, चराई, वृक्षतोड, विस्तव पेटवणे, कचरा टाकणे आणि शेती करणे या कृती या अधिसूचित राखीव वनात आढळून आल्यास भारतीय वन अधिनियम 1927 अनुसार एक वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आणि 5 हजार रुपये द्रव्यदंड तसेच नुकसान  भरपाई अशी कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे. हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. असे कृत्य केल्यास मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक 87 / 2006 दि. 17 सप्टेंबर 2018 अन्वये दिलेल्या आदेशाचे सुद्धा उल्लंघन होईल, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात राज्य शासनाने 24 तास टोल फ्री क्र. 1926 जाहीर केला आहे.

ही वनजमीन 6 एप्रिल 2023 रोजी सेक्शन 4 नुसार राखीव झाली असल्याची प्रक्रिया झाल्यामुळे भाईंदर, उत्तनपासून ते ठाण्यापर्यंतच्या राखीव वनजमीनींमध्ये काही लोकांची घरे आणि शेती गेल्यामुळे संबंधितांकडून आक्षेप मागवण्यात आले. सेक्शन 4 नुसार त्याची मुदत 15 जानेवारीपर्यंतच होती. आक्षेपात वाढ झाल्यामुळे  भाईंदर, उत्तन आणि ठाणे येथील लोकांनी आक्षेप घेतले. त्याचा अहवाल उप जिल्हाधिकारी दर्जाचे फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर (एफएसओ) / वन जमाबंदी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, असे वन विभातील सूत्रांनी सांगितले. फॉरेस्ट लँड अंतर्गत काही बांधकामे करण्यात आली असली, तरीही तेथील बांधकामांचे ‘सर्वे क्रमांक’  वन खात्याकडे आले आहेत. शिवाय महाराष्ट्र शासन जुन्या सोसायट्यांना यातून वगळण्यात येणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. त्या बांधकामांना, सोसायट्यांना फॉरेस्ट लँडमधून वगळण्यात येणार असून, कारण ती बांधकामे कायदेशीर आहे. ठाणे पूर्वेला स्वामी समर्थ स्वामींचा मठ आहे. त्या मठाच्या बांधकामासंबंधी आक्षेप होते. ते तपासणीत निराधार ठरले, मात्र त्या भागात असलेल्या झोपडपट्ट्या काढून टाकल्या आहेत. वन विभागाच्या जमीनींबाबत कोणतीही संदिग्:धता असता कामा नये, ही वन विभागाची स्पष्ट  भूमिका आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content