Homeहेल्थ इज वेल्थवाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर...

वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर डॅा. दीपक सावंत कार्यरत…

वाढत्या कोविड व एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य सचिव एन. नवीन सोना यांची जी. टी. हॅास्पिटल येथील त्यांच्या कार्यालयात नुकतीच भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र ग्रामीण भागात रूग्ण सापडू लागले आहेत. विशेषत: सांगली मिरज, बुलढाणा व इतरत्र रूग्णसंख्या वाढत आहे. आयसोलेशन बेडस आवश्यक आहेत, तसेच मुंबई, ठाणे येथेही रूग्णसंख्या वाढत आहे. दोनही महानगरपालिकांशी बैठका करून आढावा घेणे दररोज सुरू असल्याची माहिती एन. नवीन सोना यांना यावेळी त्यांनी दिली.

कोविड

डॅा. दीपक सावंत यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषकरून मॅाल, सिनेमाहॅाल व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याविषयी सूचना सरकारने कराव्यात. ओमायक्रॅान एक्सबीबी १.१५ हा व्हेरिएंट सध्या भारतात आहे. यावेळी व्हायरस म्युटेट झाला तर होणारे परिणाम म्हणजेच लक्षणाच्या तीव्रतेवर लक्ष ठेवावे लागेल, अशी सूचना त्यांनी केली.

जीनोम सिक्वेसिंगचे रिपोर्ट लवकर व्हावे तसेच लॅब इन्व्हेस्टिगेशनसाठी अव्वाच्या सव्वा पैसे पेशन्टला मोजावे लागतात. त्यामुळे त्याला कॅप लावणे, कस्तुरबासह इतर ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन माफक दरात वा मोफत होणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी केल्या. जनरल प्रॅक्टीशिनर्सना ट्रीटमेंट प्रोटोकॅाल दिल्यास व वेळेतच योग्य उपचार झाल्यास हॉस्पिटलायझेशन कमी होईल. तसेच ग्रामीण व निमशहरी भागात खाजगी हॅास्पिटल रूग्णांना राखीव बेडस आरक्षित करून ठेवाव्यात या सूचनांचे सचिव सोना यांनी स्वागत केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content