Homeटॉप स्टोरीतुमचा लवकरच मिस्टर...

तुमचा लवकरच मिस्टर इंडिया होणार!

आज आपल्या विरोधात येत असलेल्या निकालांमुळे वैफल्यग्रस्त झालेले काही लोक कोणाला तरी मोगॅम्बो बोलत आहेत. काही हरकत नाही. तुम्ही बोला. पण तुम्हीच मिस्टर इंडियाप्रमाणे हळूहळू गायब होत आहात, हे लक्षात ठेवा, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत दिला.

राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी या सरकारच्या सात महिन्यांच्या कालावधीची तुलना मागच्या सरकारच्या अडीच वर्षांच्या कारभाराशी केली. या सात महिन्यांचा कारभार पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हे सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर काम करत आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी या सरकारमधल्या शिलेदारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती. त्याआधी अडीच वर्षे महाराष्ट्राला पनवती लागली होती. या सात महिन्यांत न्यायालय किंवा इतर एजन्सीकडून होत असलेले निर्णय बघता विरोधकांचा फक्त एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचे दिसते. आपल्या बाजूने निर्णय लागला तर तो लोकशाहीचा विजय आहे आणि विरोधात निर्णय झाला तर टीका करायची, हा यांचा कार्यक्रम आहे. अलीकडे झालेला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोणी करायचा यावर न्यायालयाचा निर्णय विरोधकांच्या बाजूने झाला तेव्हा यांनी न्यायालयाचे तोंड भरून कौतुक केले. मात्र त्यानंतर काही दिवसांतच निवडणूक आयोगाने निर्णय दिला तर हे आयोगाला चुना लावणारे आयोग असे बोलू लागले. आमच्या बाजूने जो निर्णय देणार नाही तो वाईट… ही भूमिका विरोधक घेत आहेत, असे राणे यांनी सांगितले.

या सात महिन्यांत सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत आहे असा आरोप केला जात आहे. मग मागे अडीच वर्षांत आपण काय करत होता? नारायण राणे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, या आणि अशा कितीतरी भाजपा नेत्यांचे पोलीस संरक्षण आपण कमी केले. तेच नियम आता लागू आहेत. मग संरक्षण कमी झाले तर कशाला बोंबलत फिरताय, असा सवाल त्यांनी केला.

मिस्टर

ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते परत कधीच निवडून आले नाहीत अशी टीका काही विरोधक करत आहेत. पण त्यांना सांगू इच्छितो की नारायण राणे यांनी 2005ला जेव्हा शिवसेना सोडली त्यानंतर ते आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व आमदार प्रचंड मताधिक्याने पुन्हा निवडून आले. श्याम सावंत हा एकमेव अपवाद वगळला तर एकही आमदार या निवडणुकीत पडला नाही. कालिदास कोळंबकर तर आजही या विधानसभेत आहेत. तब्बल 30000 मतांनी ते निवडून आले होते आणि तुम्हाला सांगतो की 2024च्या निवडणुकीत शिवसेनेत सध्या बंड केलेले चाळीस आमदार भरघोस मतांनी पुन्हा निवडून येतील. म्हणतात… राणे साहेबांना एका बाईने पाडलं. राणे साहेब पराभूत झाले ते २०१४मध्ये आणि त्यानिमित्ताने तुम्ही महिलांचा तो अपमान करताय तो राज्यातील जनता कधीही सहन करणार नाही. आता दोन मार्चलाच दिसून येईल की बाई कोणाला पाडते ते… असेही नितेश राणे म्हणाले.

आज या सरकारने लव जिहादच्या विषयावर एक समिती नेमली आहे. कोणीही कोणावर प्रेम करावे, कोणीही कोणाशीही लग्न करावे. पण जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर कारवाई केली जाणारच. आज गडकिल्ले अतिक्रमित होत नाहीत आणि तुम्हाला सांगतो पुढच्या काळातही राज्यातल्या कोणत्याही गड किल्ल्यांवर अतिक्रमण दिसणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content