Homeटॉप स्टोरीराज्यपाल भगतसिंग कोश्यारी...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त! रमेश बैस यांची नेमणूक!!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा देण्याचा मनोदय आज पूर्ण झाला. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रमाण मानत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदमुक्त केले आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातून जारी केलेल्या एका आदेशाद्वारे आज 13 राज्यपाल तसेच नायब राज्यपाल यांच्या नेमणुका करण्यात आल्या. निवृत्त लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्राम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीमचे राज्यपाल असतील. सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली असून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला काम पाहणार आहेत. गुलाबचंद कटारिया आसामचे नवे राज्यपाल असतील.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस

निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याआधी ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया ओकिये यांची मणिपूरच्या राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मणिपूरचे राज्यपाल एल. ए. गणेशा यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content