Homeडेली पल्सआता रेल्वेत मागवा...

आता रेल्वेत मागवा व्हॉट्सअॅपवर खाद्यपदार्थ!

भारतीय रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ मर्यादितने (आयआरसीटीसी) विकसित केलेल्या विशेष www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या तसेच ई-कॅटरिंग अॅप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातून ई-खानपान सेवा सुरू केली आहे. ई-खानपान सेवा अधिक ग्राहककेंद्रित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअॅप संपर्क सुरू केला आहे. यासाठी बिझनेस व्हॉट्सअॅप क्रमांक +91-8750001323 सुरू करण्यात आला आहे.

सुरुवातीला, व्हॉट्सअॅप संपर्कांद्वारे ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आखण्यात आली. पहिल्या टप्प्यात www.ecatering.irctc.co.in या दुव्यावर क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस व्हॉट्सअॅप नंबर संदेश पाठवला जाईल. या पर्यायासह, ग्राहकांना अॅप डाउनलोड न करताही थेट आयआरसीटीसीच्या ई-खानपान संकेतस्थळाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मागणी त्यांना नोंदवता येईल.

सुरुवातीला, निवडक रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या ई-खानपान सेवेसाठी व्हॉट्सअॅप संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरू करेल. आज, ग्राहकांना दरदिवशी अंदाजे 50000 भोजनाची मागणी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तसेच अॅपद्वारे उपलब्ध करून दिलेल्या ई-खानपान सेवांद्वारे पूर्ण केली जात आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content