Homeडेली पल्सबाळसाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या...

बाळसाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला ठाकरेंची दांडी?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्या मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होत असून यावेळी उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील कोणीही सदस्य उपस्थित राहणार नसल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवरूनही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचे नाव निमंत्रणपत्रिकेवर नसल्याचा मुद्दा पुढे आला. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री तसेच आमदारही आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पत्रिकेवर असायला हवे होते, असे त्यांचे पाठिराखे बोलत होते.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतः फोन करून कार्यक्रमाला सहकुटूंब येण्याची विनंती केली. तसे त्यांनी स्वतःच माध्यमांना सांगितले. मात्र, ठाकरे कुटुंबाकडून यावर कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. किंबहुना बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद हॉलमध्ये एक मेळावा आयोजित केला आहे. खासदार संजय राऊत यांनी, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजर राहणार की नाही असे विचारले असता हा राजकीय कार्यक्रम असल्याची टिपण्णी केली होती. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी, हा संपूर्णपणे सरकारी कार्यक्रम असल्याचे सांगत राऊत यांच्यावर पलटवार केला. महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातल्या २८८ आमदारांचा हा कार्यक्रम आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना या कार्यक्रमाच्या आयोजनावर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. माझे आजोबाही विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचे अनावरण होत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे राज्य मागे गेले आहे. राज्य ओके नाही. पण हे ओके होऊन बसले आहेत. जेव्हढे ते खालच्या पातळीवर जातील तेव्हढे आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानांवरूनही ठाकरे कुटुंबीय या कार्यक्रमाला जाणार नाहीत, याचीच पुष्टी मिळते, असे जाणकारांचे मत आहे.

Continue reading

‘अंगूरी भाभी’ने लावलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे!

प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे...

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर' (सीएसआय) या कंपनीने भारतातील 'पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील...
Skip to content