Homeहेल्थ इज वेल्थनायर रुग्णालयातील रुग्णाला...

नायर रुग्णालयातील रुग्णाला मिळाला प्रगत कृत्रिम हात!

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्माईल कौन्सिल, या बिजनेस सेंटर अंतर्गत बायोनिक होप प्रा. लि. या नवउद्यमी संस्थेने तयार केलेले प्रगत कृत्रिम हात मुंबई सेंट्रलमधल्या पालिकेच्या बाई य. ल. नायर धर्मादाय रूग्णालयातील गरजू रूग्णास सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पालिकेने नागरी तंत्रज्ञानावर आधरित “सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कौन्सिल” बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या सेंटरचा उद्देश नाविन्यपूर्ण वस्तू, उपकरण व तंत्रज्ञान याबाबत असलेल्या नवउद्यमी (स्टार्टअप) ह्यांना मदत करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, हा आहे. स्माईल कौन्सिल ही संस्था नाविन्यपूर्ण स्टार्टअपद्वारे तयार केलेल्या वस्तू, उपकरण व तंत्रज्ञान ह्यांची संबंधित विभागाच्या सहकार्याने पालिकेमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपयोगात आणण्याची संधी प्रदान करते. स्माईल कौन्सिल्सच्या पहिल्या तुकडीमध्ये बायोनिक होप प्रा. लि. या स्टार्टअपचा समावेश आहे.

बायोनिक होप, या स्टार्टअपने प्रगत कृत्रिम हात तयार केलेला आहे. जो इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक नैसर्गिक आणि मुक्त हालचाल करण्यास मदत करतो. हा कृत्रिम हात स्माईल कौन्सिलने प्रायोगिक चाचणीकरिता पालिकेच्या रुग्णालयांमध्ये नोंदवलेल्या गरजू प्रकरणांनुसार उपलब्ध करुन दिलेला होता. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे (१६ जानेवारी २०२३) औचित्य साधून प्रायोगिक तत्त्वावर नायर रूग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागातील रूग्णास हा प्रगत कृत्रिम हात बसवण्यात आला. या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रोफेसर डॉ. कुमार डूसा कामकाज पाहत होते. या कार्यक्रमास संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) तथा नायर रूग्णालय व दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे, प्रमुख व्यवसाय विकास शशी बाला, ऑर्थोपेडिक्स विभाग प्रमुख डॉ. आर. सी. एस. खंडेलवाल व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content